शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -सोशल मीडियावर मेसेजचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 16:09 IST

तिरडी स्मशानात घेऊन जाताना ‘येतोस का डबल सीट?’ अशी चेष्टा करण्यात माहीर असलेल्या कोल्हापूरकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या कर्फ्यूलाही सोडले नाही. ‘आलाय कोरोना तर घरात बसा ना!’ असा संदेश सर्वत्र धुमाकूळ घालत असताना कोल्हापूरकरांनी मात्र सुट्टी आणि सुग्रास भोजनाचा आनंद घेत मोबाईलवरील संदेशांतून धुरळा उडवून दिला.

ठळक मुद्देसोशल मीडियावर मेसेजचा धुरळा‘आलाय कोरोना तर घरात बसा ना!’

कोल्हापूर : तिरडी स्मशानात घेऊन जाताना ‘येतोस का डबल सीट?’ अशी चेष्टा करण्यात माहीर असलेल्या कोल्हापूरकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या कर्फ्यूलाही सोडले नाही. ‘आलाय कोरोना तर घरात बसा ना!’ असा संदेश सर्वत्र धुमाकूळ घालत असताना कोल्हापूरकरांनी मात्र सुट्टी आणि सुग्रास भोजनाचा आनंद घेत मोबाईलवरील संदेशांतून धुरळा उडवून दिला.

‘एक दिवस घरात बसा; नाहीतर पुढचे तेरा दिवस भावकीच घरात बसायला येईल,’ असे मेसेज पाठवून कोल्हापूरकरांच्या चेष्टेचा नाद करायचा नाही, हेच दाखवून दिले.रविवारी देशभर कर्फ्यू असल्याने नागरिकांना सक्तीने घरात बसावे लागले. पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने उंबऱ्याबाहेर कुणालाच पडता आले नाही. बाहेर काय चाललंय हे एक तर टीव्ही आणि हातातील मोबाईलवरील सोशल मीडियावरून कळत होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांनी संदेशांची देवाणघेवाण केली.

कोरोनाची धास्ती मनात आहेच; पण तिलाही चेष्टेचा सूर लावण्याचा कल प्रत्येक संदेशातून दिसत होता. मानवी स्वभावातील व्यंगांवर अचूक बोट ठेवणारे, कोरोनापासून सावध करणाºया मेसेजबरोबरच गमतीशीर संदेशांनी चेहऱ्यावर हास्य फुलविले.घरातच बसावे लागल्याने अनेकांनी ‘घरात बसून आहे तर ‘बिग बॉस’मध्ये असल्यासारखे वाटायला लागलंय. नुसती भांडणं आणि टोमणे सुरू आहेत घरात,’ अशी मिश्किल टिप्पणी केली. टाळ्या वाजविण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर ‘एक टाळी तिच्यासाठीपण वाजवा, जी सकाळी उठल्यापासून तुमच्यासाठी गॅसजवळ उभी आहे,’ असे सांगून महिलांची कदर करण्याचा सल्लाही दिला.

‘कोणी गेल्यावर गाव बंद ठेवलेले अनेकदा पाहिलंय; पण कोणी जाऊ नये म्हणून गाव बंद झालेले आज पहिल्यांदा पाहिलंय,’ असे सांगत यामागची दाहकताही समोर आणली. ‘ही जीवनातील अशी पहिली शर्यत आहे, जिथे थांबणारा जिंकणार आहे,’ असे सांगून वेळ आणि काळ आल्यावर कसे बदलते, यावर अचूक भाष्य केले. ‘जनता कर्फ्यू रात्री नऊ वाजेपर्यंत आहे, त्यानंतर भारत वर्ल्ड कप जिंकल्यासारखं बाहेर नका पडू नका,’ असे सांगत कोल्हापूरकरांना गमतीतूनच टोमणेही मारले.)

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर