शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘कंटेनर’ खरेदीत ढपला

By admin | Updated: March 30, 2017 01:19 IST

भूपाल शेटेंचा आरोप : अधिकाऱ्यांची साखळी; ६३ लाखांचा गैरव्यवहार

कोल्हापूर : आयुक्त पी. शिवशंकर यांच्या पारदर्शक कारभारामुळे गेल्या वर्षभरात महानगरपालिकेत कोणताही घोटाळा झाला नसला तरी ते बढतीवर बदली होऊन जात असताना मात्र लोखंडी कोंडाळे (कंटेनर) खरेदीत अधिकाऱ्यांच्या एका साखळीने ६३ लाखांचा आंबा पाडल्याचा आरोप बुधवारी सत्तारूढ काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करावी, तसेच महानगरपालिकेची फसवणूक केल्याबद्दल ठेकेदाराविरुद्ध फौजदारी दाखल करावी, अशी मागणीही त्यांनी केली. महानगरपालिकेने नुकतेच ३०० लोखंडी कोंडाळे खरेदी केले असून, या कामात घोटाळा झाल्याचा शेटे यांचा आरोप आहे. महानगरपालिकेने नागपूर येथील तिरुपती एंटरप्रायजेस या कंपनीकडून ३०० कंटेनर कचरा कोंडाळे खरेदी केले असून, त्यांची किंमत १ कोटी १८ लाख रुपये इतकी आहे. हे कंटेनर हलक्या दर्जाचे मटेरियल वापरून बनविले आहेत हा शेटे यांचा प्रमुख आक्षेप आहे. कोंडाळ्याला लोखंडी प्लेट वापरायच्या असताना हलक्या दर्जाचा पत्रा वापरला आहे. त्याचे वजन हे ४३० किलो असायला पाहिजे होते, ते प्रत्यक्षात ३४० किलो आहे. कोल्हापुरातील उद्यम को. आॅप. सोसायटीच्या वजनकाट्यावर त्याचे वजन केल्यावर ही बाब उजेडात आली. ठेकेदाराने एका कंटेनरची किंमत ३९ हजार रुपये लावली आहे. मात्र, त्यांनी वर्कशॉपमध्ये जमा केलेल्या कंटेनरची किंमत ही प्रत्यक्ष १८ हजार रुपयेच आहे. त्यामुळे प्रत्येक कंटेनरमागे २१ हजार रुपये जादा किंमत दिली आहे. करारात ठरलेल्या अटी व नियमाप्रमाणे कंटेनर आहेत की नाही याची तपासणी करून घेण्याची जबाबदारी वर्कशॉप विभागाचे प्रमुख रावसाहेब चव्हाण, सहायक अभियंता सुनील पुजारी, वाहन निरीक्षक विजयकुमार दाभाडे, अमरकुमार बिसुरे यांची होती. त्यांनी नागपूर येथील कारखान्यास भेट दिली; पण प्रत्यक्षात मटेरियलची पाहणी केली नाही. ठेकेदाराने या सर्व अधिकाऱ्यांची मोठ्या हॉटेलात बडदास्त ठेवली होती, त्यांनी कोणतेही आक्षेप घेतले नाहीत, त्यामुळेच हा मोठा गैरव्यवहार झाला आहे. याची निप:क्षपणे चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी शेटे यांनी केली आहे.लक्ष घालताच कंटेनर वाटलेभूपाल शेटे यांनी या प्रकरणात लक्ष घालताच अधिकाऱ्यांमध्ये गडबड सुरू झाली. कोणतीही अधिकृत माहिती देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले तसेच कराराप्रमाणे पुरवठा झाला का हे पाहण्याची जबाबदारी असतानाही अधिकाऱ्यांनी तसे न करता ३०० पैकी २६० कंटेनर प्रभागात वाटून टाकले. सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी ४० कंटेनर वर्कशॉपमध्ये शिल्लक ठेवले. त्याची बुधवारी तपासणी केली असता हा घोटाळा उघडकीस आला. शिल्लक कंटेनर ठेकेदारास परत करावेत, अशी मागणी शेटे यांनी केली. आयुक्तांचा एवढा वचक असूनही कंटेनर घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात अधिकाऱ्यांची एक मोठी साखळी असल्याचा आरोप शेटे यांनी केला. निविदा मंजूर करण्यापासून ते अंतिम बिल देण्यापर्यंतचे सर्व अधिकारी या प्रकरणात अडकले आहेत. निविदा उघडल्यावर आधी सुशीलानंद इक्विपमेंटस् (कागल एमआयडीसी) यांना कंटेनर पुरवठ्याचे काम दिले, पण दोन दिवसांनी हेच काम तिरूपती एंटरप्रायजेस यांना दिल्याचे शेटे यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांवरसुद्धा आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे, असे शेटे म्हणाले.