शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात 'पद्मावती'च्या सेटवर जाळपोळ

By admin | Updated: March 15, 2017 12:22 IST

संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा पद्मावतीच्या सेटवर अज्ञातांनी तोडफोड करत गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 15 - बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमा पद्मावती सिनेमाविरोधातील वाद वाढतच आहेत. कोल्हापुरातही सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत अज्ञातांनी सेटवर तोडफोड केली. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे.
 
पन्हाळगडावरील मसाई पठारवर सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते.  यावेळी अज्ञातांनी सेटवरील गाड्यांची तोडफोड करत जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 
(भन्साळींवरील हल्ल्याचं कारण ठरलेली राणी पद्मावती नेमकी कोण होती?)
 
यापूर्वी जयपूरमधील सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावतीच्या सेटवर तोडफोड करून भन्साळी यांना थापड देखील मारली होती. तेराव्या शतकात तत्कालीन दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडगड येथील शिशमहालात राणी पद्मिनीची एक झलक पाहिली होती. यादरम्यान राणी पद्मिनीने या गडावरच जोहार केला होता. या पार्श्वभूमीवर पद्मावतीचे चित्रीकरण जयपूर येथे सुरु असताना संघटनेने तोडफोड केली. पाठोपाठ चितोडगडमधील ऐतिहासिक शिशमहालातील आरसेही फोडले होते. या घटनेचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही बॉलीवूडच्या दिग्गजांनी केली होती. 
 
करणी सेनेने याआधीही हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोधा अकबर’ सिनेमालाही विरोध केला होता. करणी सेना स्वत:ला राजपूतांच्या हितांची रक्षक असल्याचं सांगते. करणी सेना राजस्थानमध्ये काम करते.