२) हातकणंगले तालुक्यात एक महिना पिकांच्या पंचनाम्यासाठी गेला. गावनिहाय पंचनामे पूर्ण झाले आहेत. ११ हजार २५७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी साडेआठ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. एक हजार हेक्टरवर दुबार लावणी केल्या आहेत. सोयाबीनची सुमारे १ हजार २०० हेक्टर दुबार पेरणी झाली आहे.
३) गेल्या दीड महिन्यातून अधिक काळ खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बारामती व स्थानिक कर्मचारी यांनी जिद्दीने प्रयत्न केले. नवीन पोल, डीपी, ट्रान्सफॉर्मर, मुख्य वाहिनी, लघुदाब वाहिनी यांची ८५ टक्के कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित कामे आठवडाभरात पूर्ण होतील. गाव पाणी पुरवठा तसेच सहकारी पाणी पुरवठा संस्था यांचा पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे. सचिनकुमार जगताप (उपकार्यकारी अभियंता, वडगाव मंडल)
४) साखर कारखान्यांनी पूरग्रस्त उसाचा सर्व्हे सुरू केला आहे. प्रत्येक कारखान्याने आपल्याकडे नोंद असणारा ऊस किती प्रमाणात खराब झाला आहे याची वर्गवारी केल्याची माहिती संकलित केली असल्याचे समजते. प्राधान्याने पूर भागातील ऊस तोडण्याचे नियोजन शेती विभाग तयार करीत आहे. फोटो ओळी- १ महापुराने वारणा काठचा काळाकुट्ट होऊन वाळत चालला आहे. त्याचा उपयोग वैरणीसाठी केला जात आहे. २) काही ठिकाणी भला दांडगा ऊस भुईसपाट निपचिप होऊन पडला आहे.(छाया -आयुब मुल्ला)