शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेत बोरगावमध्ये गोंधळ

By admin | Updated: March 23, 2015 00:50 IST

चुकीची उत्तरपत्रिका : पालकांचा संताप; केंद्रप्रमुख, निरीक्षकांवर कारवाईची मागणी

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्याने गोंधळ उडाला. उत्तरपत्रिका हाती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार करूनही केंद्रसंचालक व निरीक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत, दिलेली उत्तरपत्रिकाच सोडविण्यास सांगितली. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केला. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडेही तक्रार केली. त्यांनी संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याचे, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची ग्वाही दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.बोरगाव येथील हिंदमाता केंद्रावर रविवारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २१६ विद्यार्थी या केंद्रावर परीक्षेसाठी होते. बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा असल्याने कलरकोड, बारकोडनुसार प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचे नियोजन करण्यात येते. रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मराठी विषयाचा पेपर होता. यावेळी केंद्रप्रमुख व निरीक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठीची लाल रंगाची प्रश्नपत्रिका व दुपारी ३ वाजता असलेल्या बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेची हिरव्या रंगाची उत्तरपत्रिका दिली. हा प्रकार लक्षात आल्यावर काही विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार केली. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेवर विषयांचा उल्लेखही होता.बुद्धिमत्तेचे गुण मराठीला, मराठीचे गुण बुद्धिमत्तेलाया परीक्षेवेळी देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेतील विसंगतीमुळे विद्यार्थीच नव्हे, तर पालकही संभ्रमात आहेत. बहुपर्यायी पद्धतीनुसार परीक्षा असल्याने लाल रंगाच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेची हिरव्या रंगाच्या बुध्दिमत्ता विषयाच्या उत्तरपत्रिकेत नोंदविलेली उत्तरे चुकीची ठरणार आहेत. हाच प्रकार बुद्धिमत्ता विषयाच्या बाबतीतही होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन चुकीचे ठरणार आहे.मराठी विषयाला बुद्धिमत्ता विषयाचे, तर बुद्धिमत्ता विषयाला मराठी विषयाचे गुण मिळणार आहेत. त्यामुळे अजूनही याबाबतची संभ्रमावस्था दूर झाली नाही.