शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

डॉल्बीधारकांना लाखाचा दणका

By admin | Updated: October 3, 2015 00:57 IST

पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल

एकनाथ पाटील / कोल्हापूर गेली दोन-तीन वर्षे सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा मोडीत काढणाऱ्या ६७ सार्वजनिक मंडळांवर पोलिसांनी यंदा पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. दरम्यान, संबंधित मंडळांवर कठोर कारवाईसाठी विसर्जन मिरवणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण, वृत्तपत्रांतील बातम्या, छायाचित्रे यांचा आधार घेत, तसेच सरकारी पंचांची साक्ष घेऊन लवकरच या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याची पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे. या गुन्ह्यांमध्ये बहुतांश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या कारवाईमध्ये डॉल्बी यंत्रणेचे मालक, चालक, मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व ज्या वाहनांवर डॉल्बी यंत्रणा ठेवण्यात आली त्या वाहनांचे चालक, मालक, आदींना झटका बसणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांतील प्रतिसादामुळे यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवण्याचा निर्धार जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरुवातीस केला. या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांची बैठक घेऊन, नियम डावलून डॉल्बी लावणाऱ्या तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलीस प्रशासनाने केली होती. तसेच प्रत्येक मंडळाला लेखी नोटीसही बजावण्यात आली होती. निवासी परिसरात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा मंडळांना घालून दिली होती. तसेच डॉल्बी लावल्याने मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचे जाहिरातींच्या माध्यमातून प्रबोधनही केले होते. त्यामुळे अनेक मंडळांनी डॉल्बी लावणार नाही, असे पत्र देखील पोलिसांना दिले. मात्र प्रत्यक्षात त्यांनी मिरवणुकीदिवशी पोलिसांच्या नाकावर टिच्चून डॉल्बी लावले. मात्र आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने डॉल्बी लावण्यापासून मंडळांना रोखू नका, असा राजकीय दबाव पोलिसांवर असल्याने विसर्जन मिरवणुकीत ऐनवेळी डॉल्बी घेऊन आलेल्या मंडळांना पोलिसांनी रोखले नाही. मात्र संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही ध्वनिक्षेपक मापन यंत्राद्वारे डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा तपासली. त्याचा अहवाल त्यांनी पोलिसांना दिला आहे. मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुमारे ६७ मंडळांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. या संपूर्ण गुन्ह्यांमध्ये शासकीय पंचांची साक्ष घेण्यात आली आहे. लवकरच डॉल्बी विरोधातील भक्कम पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. तरुणांच्या भविष्याचे नुकसान डॉल्बीविरोधात गुन्हे दाखल झालेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पासपोर्ट, शासकीय, निमशासकीय नोकरीस हजर होताना अडचणी निर्माण होऊन त्यांच्या भविष्याचे नुकसान होणार आहे.