शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

बावड्यात रंगारंग ‘मिक्टा’ची धूम

By admin | Updated: January 26, 2016 01:22 IST

‘चला हवा येऊ द्या’मुळे रंगत : शिटी वाजली..., शांताबाईने रसिकांना डोलविले

कसबा बावडा : शिट्टी वाजली... अन् गाडी सुटली, शांताबाई शांताबाई..., खेळताना रंग बाई होळीचा..., मला जाऊ द्या ना घरी..., विंचू चावला..., बाई माझी करंगळी मोडली, अशी एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या, डोलायला लावणाऱ्या गाण्यांनी बावडेकरांची मने जिंकली. पॅव्हेलियन मैदानावर रंगलेल्या ‘मिफ्टा’च्या (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अ‍ॅण्ड थिएटर अवॉर्ड) पूर्वरंग सोहळ्यात ‘चला हवा येऊ द्या’च्या कॉमेडी टीमने हास्याचा पाऊस पाडला. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. पॅव्हेलियन मैदानाचा कोपरा न् कोपरा रसिकांनी फुलून गेला होता. ऊर्मिला कानेटकर-कोठारी यांच्या गणेशवंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके व ‘हवा येऊ’च्या सर्वच टीमने उपस्थितांना खळखळून हसवले. पूजा सावंतच्या लावण्यांनी रसिकांना घायाळ केले. अवधूत गुप्ते यांचे मंचावर आगमन होताच टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला. ‘कोल्हापूर-कोल्हापूर नाद खुळा कोल्हापूर’ या त्यांच्या नव्या गीताने व बेला शेंडे यांच्या ‘मला जाऊ द्या ना घरी’, ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ या ठसकेबाज लावण्यांनी रसिकांनी मैदानचं डोक्यावर घेतलं. शांताबाईच्या वेषात भाऊ कदमांची मंचावर ‘एन्ट्री’ होताच शांताबाईच्या गीताने रसिक घायाळ झाले. अनिकेत व नेहा पेंडसे यांच्या ‘देखा जो तुझे यार दिलमे बजी गिटार’ तसेच मानसी नाईक यांच्या ‘आलिया गावात... अजब वरात’ या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. गौरी इंगवले, मृण्मयी देशपांडे, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर, आदीनाथ कोठारे, जितेंद्र जोशी, रश्मी महाजनी, सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव, मानसी नाईक या कलाकारांमुळे रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम रंगला. यावेळी ‘मिफ्टा’च्या विविध विभागांतील नामांकने जाहीर झाली. डॉ. डी. वाय पाटील यांच्या गौरव महाराष्ट्राचा पुरस्काराची घोषणाही केली. याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावरील जीवनपट दाखविण्यात आला. या सोहळ्यास डॉ. डी. वाय. पाटील, श्रीमंत शाहू महाराज, डॉ. संजय डी. पाटील, आ. सतेज पाटील, महेश मांजरेकर, मेघा मांजरेकर, ऋतुराज पाटील, शांतादेवी पाटील, पृथ्वीराज पाटील, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋषिकेश जोशी व श्रेया बुगडे यांनी केले.