शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आलास येथील ऊर्दू शाळेची इमारत धोकादायक

By admin | Updated: March 22, 2016 00:33 IST

शाळेच्या दुरुस्तीची गरज : शासनाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका, दुरुस्तीचा प्रस्तावही धूळखात

अजित चंपुणावर -- बुबनाळ -आलास (ता़ शिरोळ) येथील जिल्हा परिषदेची ऊर्दू कुमार विद्यामंदिरची दुमजली आरसीसी इमारत धोकादायक बनली आहे़ या धोकादायक इमारतीचा निर्लेखनाचा प्रस्ताव गेल्या चार ते पाच वर्षांपासून शासन स्तरावर धूळखात पडला होता़ मात्र, सततच्या पाठपुराव्यानंतर इमारतीच्या आयुष्यमानावर हा प्रस्ताव नाकारला गेला़ तद्नंतर इमारतीचा विशेष दुरुस्तीसाठी जानेवारी २०१५ ला प्रस्ताव पाठविला आहे़ तो प्रस्तावही धूळखात पडला आहे़ येथील सय्यद सादात दर्ग्याजवळ जिल्हा परिषद ऊर्दू कुमार विद्यामंदिरचे ३० गुंठे विस्तीर्ण जागेत सन १९८८-८९ साली इंदिरा आवास योजनेंतर्गत पाच खोल्या व शैक्षणिक उठावातून ग्रामस्थांच्या देणगीतून एक खोली, अशा सहा खोल्यांचे दुमजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते़ या शाळेत सध्या पहिली ते सातवीपर्यंत १५३ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शिक्षकांची संख्या सात आहे़ दरम्यान, शाळेची इमारत काळ्या मातीच्या जमिनीत बांधली असून, सन २००५ साली आलेल्या महापुराचा फटका या शाळेच्या इमारतीला बसला आहे़ या इमारतीत महापुराचे पाणी पाच फुटांवर शिरले होते़ हे पाणी पाच ते सहा दिवस या इमारतीत राहिल्याने जमीन खचून इमारत ढळली आहे़ प्रथमदर्शनी शाळेची समोरील बाजू रंगरंगोटी केल्याने पाहणाऱ्यांना बाहेरून शाळा सुंदर दिसते़ मात्र, आतील बाजूस सरकलेले पिलर व भिंतींना गेलेले तडे हे स्पष्ट दिसत आहेत़ तर एकमेकाला अडकत असलेले पिलर सुटून अंतराळी राहिले आहेत़ त्यामुळे ही इमारत शाळेला धोकादायक बनली आहे़ आजही या शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतचे १५३ विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालूनच या धोकादायक इमारतीत ज्ञानार्जन करीत आहेत़ त्यामुळे पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासन स्तरावर दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे़ येथील शाळेची इमारत केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे़ अनेक मुले या शाळेतून दर्जेदार शिक्षण घेतात़ मात्र, जिल्हा परिषदेत गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करूनही याची दखल घेतली जात नाही़ तरी लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा, न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन करू़ - दीपाली बोरगांवे, सरपंच, ग्रामपंचायत आलास.या शाळेची इमारत धोकादायक बनल्यामुळे दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे़ मात्र, हा निधी अद्याप मंजूर झाला नाही़ तरी या इमारतीसाठी १५ ते २० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने मी या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार आहे़ - सुनंदा दानोळी, जिल्हा परिषद सदस्य, आलास.