शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विम्याची बांधकाम कामगारांसाठी कवचकुंडले

By admin | Updated: September 7, 2014 23:20 IST

योजना पूर्ववत : कामगारांचा लढा यशस्वी

म्हाकवे : बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने जीवनदायिनी असणारी आरोग्य विमा योजना गत महिनाभरापासून बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला होता. त्यामुळे राज्यातील हजारो कामगारांनी संघटित होऊन प्रशासनाशी लढा दिला. या लढ्याला यश आले असून, ही योजना पूर्ववत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत कामगार वर्गात समाधानाचे वातावरण आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक कामगाराच्या कुटुंबाची ‘कवचकुंडले’ आहेत. ती शासनाने हिरावून घेऊ नये, अशी भूमिका संघटनेने घेतल्याची माहितीही लाल बावटा कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. भरमा कांबळे आणि शिवाजी मगदूम-सिद्धनेर्लीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता दुसऱ्यांना निवाऱ्याची सोय करून देणारा बांधकाम मजूर मात्र बहुतांश वेळा दारिद्र्याचे जीवन जगत असतो; तर अनवधानाने या मजुराला अपघात झाला अथवा त्याला काही शारीरिक आजार उद्भवला तर त्यातून बरे होण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद नसते. त्यामुळे या मजुरासह त्याच्या कुटुंबाचीही आबाळ होण्याची शक्यता असते. याचा शासनस्तरावर विचार होऊन २५ जुलै २०१३ रोजी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी वरदान ठरणारी आरोग्य विमा योजना अमलात आणली. या योजनेतून बांधकाम कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत खर्चाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, परंतु २५ जुलै २०१४ पासून ही योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याबाबत राज्यातील हजारो कामगारांनी रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलने, निवेदनांच्या माध्यमातून ही योजना पूर्ववत करण्यास भाग पाडले. २२ आॅगस्ट पासून ही योजना पूर्ववत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सर्व कामगारांचे सहकार्य लाभल्याचेही संघटनेचे सचिव शिवाजी मगदूम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्यातील ६०० कामगारांना लाभ! शासकीय बांधकामाच्या निधीतून एक टक्का निधी या कामगारांच्या आरोग्यासाठी खर्ची केला जातो. सध्या जिल्ह्यात ३९ हजार कामगारांची नोंद शासनदरबारी असून, या सर्वच कुटुंबांना या योजनांसाठी ‘कवचकुंडलांचे’ अभय मिळणार आहे. वर्षभरात सुमारे ६०० कामगारांच्या आरोग्य सुविधेसाठी शासनाचा सुमारे चार कोटी निधी खर्ची पडला आहे.