शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

लक्ष्मीदर्शन घडवा, मनासारखी बढती अन् टेबल मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:30 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पारदर्शी, हायटेक कारभाराचे बिरूद मिरविणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या ‘लक्ष्मीदर्शना’चा नवा फंडा ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पारदर्शी, हायटेक कारभाराचे बिरूद मिरविणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या ‘लक्ष्मीदर्शना’चा नवा फंडा सुरू झाला आहे. बढती हवी आहे, मनासारखे टेबल हवे आहे तर ठरावीक रक्कम मोजल्याशिवाय मनासारखे स्थान मिळत नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यात संबंधित टेबल सांभाळणाºयापासून ते सदस्यांच्या नातेवाइकांपर्यंत सर्वांचाच हातभार लागत आहे. शिपायांना आरोग्यसेवक म्हणून बढती देताना या सर्व यंत्रणेने हात धुऊन घेतल्याची जिल्हा परिषदेत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.जिल्हा परिषदेत सध्या समायोजन प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत अनुकंपा तत्त्वावर भरती झालेल्या शिपायांना बढती दिली जात आहे. ६४ जण बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांपैकी १७ शिपायांना प्राथमिक टप्प्यात आरोग्यसेवक म्हणून बढती देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या बढतीत अन्य निकषांपेक्षा लक्ष्मीदर्शनाचा निकष सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे. प्रशासन आणि आरोग्याशी संबंधित विभागासह एका जिल्हा परिषद सदस्याच्या पतीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. या सर्वांनी एकत्रितपणे येऊन पाच दशकाच्या पटीत रक्कम निश्चित केली; पण काही कर्मचाºयांनी असमर्थता दर्शविल्यानंतर त्यात शिथिलता आणली गेली. किमान दोन दशकांची अट ठेवून त्या पटीत रकमा वसूल झाल्यानंतर बढतीची पत्रे दिली गेली आहेत. ही सर्व रक्कम साधारणपणे पाच लाखांच्या घरात गेली असल्याची चर्चा आहे. त्याचे वाटेही ठरले आहेत. यात टेबल सांभाळणाºयापासून ते वरची अंतिम सही करण्यापर्यंत सर्वांना रक्कम पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना याची कुणकुण लागू नये याची विशेष खबरदारीही घेतली गेली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मात्र याची जोरदार चर्चा सुरू आहे.संघटनेच्या माजी पुढाºयाची मध्यस्थीआपलेच सहकारी असणाºया कर्मचाºयांवर अन्याय झाला तर तो दूर करावा यासाठी श्रेणीनिहाय कर्मचारी संघटना स्थापन झाल्या आहेत.या संघटनांच्या पुढाºयांनी कर्मचाºयांचे हित पाहावे असे अपेक्षितअसते; तथापि बढती प्रकरणात माजी पदाधिकाºयानेच प्रमुख मध्यस्थाची भूमिका वठविली आहे. अधिकाºयांच्या पुढे-पुढे करून त्यांची मर्जी सांभाळत मनासारखे पद मिळविणाºया या पुढाºयाविरोधात कर्मचाºयांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.