लोकमत न्यूज नेटवर्क
बोरवडे : सोनाळीमार्गे- बिद्री मुख्य मार्गावर अनेक वाहने ये- जा करत असतात. बिद्री व कागल कॉलेजला अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचा प्रवास याच मार्गे असतो. तसेच उसाची वाहतूकही येथून सुरू असते. मात्र, येथील भिऊगडे- पाटील ओढ्याजवळील प्राचीन पूल जीर्ण झाला असून भगदाड पडले आहे. पावसाळ्यात या पुलावरून अनेक वेळा पाणी असते. त्यामुळे वाहतूक पूर्ण बंद होते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधा, नंतरच रस्ता करा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, पंचायत समिती सदस्य जयदीप पोवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे ठाकूर यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
......
कोट...
जिल्हा परिषदेंतर्गत हा मुख्य असून मार्ग येथून अनेक वाहने ये- जा करत असतात. प्राचीन पुलाची पडझड झाली आहे. पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली असतो. त्यामुळे वाहतूक बंद होते. पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
समाधान म्हातुगडे - ग्रामपंचायत सदस्य.
..............
२४सोनाळी
फोटो ओळी- सोनाळी येथील जुन्या पुलाची पाहणी करण्याकरिता पदाधिकारी आल्यानंतर ग्रामस्थांनी खड्ड्यात असे उभे राहून याचे गांभीर्य निदर्शनास आणले.