शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

अर्थसंकल्पातील संकल्प कागदावरच

By admin | Updated: January 9, 2015 00:24 IST

मागोवा अर्थसंकल्पाचा : पंचगंगा नदीप्रदूषणासह घनकचरा प्रक्रिया ‘जैसे थे’

संतोष पाटील - कोल्हापूर -शहरातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि शहरातील घनकचरा निर्गतीचा गंभीर प्रश्न याचा प्राधान्याने विचार करून, त्यातून मार्ग काढण्याचा महानगरपालिका प्रशासनाने या वर्षाच्या अंदाजपत्रकात केलेला संकल्प अद्याप कागदावरच आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र व घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत करून सहकार्य केले. मात्र, प्रशासकीय ढिलेपणामुळे प्रकल्प ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे. शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी ५० कोटींची तरतूदही प्रशासनाने केली असली तरी यासाठी राजकीय पाठबळ अपुरे पडत आहे. शहरातील विविध भागांतून वाहणाऱ्या १२ नाल्यांतील सांडपाणी अडवून ते दुधाळी व कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महापालिकेने हाती घेतला. त्यासाठी राज्य सरकारच्या ‘सुजल निर्मल अभियान’ या योजनेतून निधी आला. कसबा बावडा येथील ७५ कोटींचा ७६ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प दुसऱ्या टप्प्यातच गटांगळ्या खात आहे; तर दुधाळी येथील २६ एमएलडी प्रकल्पाची सुरुवातच झालेली नाही. घनकचरा व्यवस्थापनासाठी टाकाळा येथे शास्त्रोक्त भूमी भराव क्षेत्र विकसित करण्यासाठी ६ कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली असली तरी काम कासवगतीनेच सुरू आहे. शहर विकासाला तसेच रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असून, त्याकरिता शहरात पाच एकर जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा प्रशासनाने केली. प्रत्यक्षात माहिती तंत्रज्ञान केंद्रासाठी मुहूर्तच सापडलेला नाही. शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा सविस्तर आराखडा तयार झाला. महापालिकेचा हिस्सा म्हणून ५० कोटींची तरतूद केली. मात्र, राजकीय अनास्थेमुळे प्रकल्प मार्गी लागू शकलेला नाही. हीच अवस्था रंकाळा संवर्धनाची आहे. प्रदूषणामुळे रंकाळ्यास अवकळा आली आहे. संरक्षक कठडे कोसळून सहा महिने होऊनही दुरुस्तीसाठी हालचाली नाहीत. एकूणच अर्थसंकल्पावेळी प्रशासनाने केलेल्या घोषणा आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाही सत्रातही जैसे-थे असल्याचे चित्र आहे.शाहू स्मारकासाठी राजकीय पाठबळ पडतय अपुरे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कसबा बावड्यातील प्रकल्प गटांगळ्या खातोय, दुधाळीतील प्रकल्पाला मुहूर्र्तच नाही. टाकाळा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम कासवगतीने माहिती तंत्रज्ञान केंद्रास मुहूर्तच सापडेना. रंकाळा तलावाचे संरक्षक कठडे कोसळून सहा महिने होऊनही दुरुस्तीसाठी हालचाली नाहीत. २०१४ /१५ तील संभाव्य जमा व खर्च जमा (आकडे कोटींत)२२९ कोटींचे उद्दिष्ट. पहिल्या नऊ महिन्यांत ५० कोटींची तूटएलबीटी - ९५ , मिळकत कर - ३७.२४ , मार्के ट भाडे - ८.८२ , नगररचना - ३६.५९ ,पाणी हशील - ४९.०३ ,शासकीय अनुदान १९.८०, संकीर्ण जमा - १३.३४खर्च (आकडे कोटींत)५५०० कर्मचारी. महिन्याला १२ कोटी पगाराचा खर्चआस्थापना खर्च, पेन्शन व मानधन - १५९.०५, प्राथमिक शिक्षण मंडळ - २५.००, विद्युत खर्च- २६.१०, रस्तेदुरुस्ती - २.११ , पाणीपट्टी - ३.३५.