शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बंधू माझा दूरदेशी! रक्षाबंधन :

By admin | Updated: August 7, 2014 00:15 IST

राखी पाठविण्यासाठी पोस्टात गर्दी

सातारा : ‘बंधू माझा दूरदेशी...त्याची आठवण जीवाशी!,’ असं प्राक्तन नशिबी आलेल्या बहिणींनी रक्षाबंधनासाठी भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी पोस्टात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.बहीण आणि भाऊ यांच्यातील अतूट नात्याला आणखी घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण! या सणाला भावाच्या मनगटावर राखी बांधून पाठीशी ठाम उभे राहण्याचे अभिवचन घेण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. जग वेगाने बदलले तरीही ही परंपरा कायम आहे.नोकरी, व्यवसायानिमित्त अनेकांना आपल्या राहत्या घरापासून दूर राहावे लागते. या धावपळीत आपल्या जीवलगांची भेट होत नाही. रक्षाबंधनातही अनेकांना सुटी मिळत नाही. तसेच बहिणींनाही लांब राहणाऱ्या भावापर्यंत पोहोचता येत नाही. संरक्षण दलात काम करणारे कर्मचारी, देशभरात कुठेही बदली होणारे वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी यांना नेहमीच आपल्या जीवलगांपासून दूर राहावे लागते.पोस्ट खाते त्यांना आपल्या नातेवाइकांशी नेहमीच जोडून ठेवते. त्यामुळे रक्षाबंधनादिवशी बहिणी या पोस्टाचाच आधार घेतात. पोवई नाक्यावरील पोस्ट कार्यालयात राख्या पाठविण्यासाठी बहिणींनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)