शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील प्राधिकरण कार्यालयात दलाल बोले, फाईल हाले; लाखोंचा ढपला

By भीमगोंड देसाई | Updated: July 19, 2023 17:00 IST

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : येथील कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात दलाल बोले, कामाची फाईल हाले अशी व्यवस्था निर्माण ...

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : येथील कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात दलाल बोले, कामाची फाईल हाले अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. सध्या येथे सहा दलालांनी कामकाज हायजॅक केल्याचा आरोप होत आहे. त्यातील दोन दलाल साहेबांना ने-आण करण्यासह हवे, नको ते पाहण्यात सक्रिय असतात. यामुळे साहेब कार्यालयात कधीही येतात, वेळेत काम करणाऱ्यांना पाठिशी घालतात, मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर उचलत नाही, अनेकवेळा मोबाईल स्वीच ऑफ ठेवत असल्याच्याही तक्रारी आहेत. परिणामी प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ४२ गावातील रहिवाशांनी बांधकाम परवान्यासह विविध कामानिमित्त दलालांकडे न जाता थेट प्रस्ताव दाखल केले तर हेलपाटे मारायला लावले जाते.मध्यवर्ती शासकीय इमारतीत प्राधिकरणाचे असलेल्या कार्यालयातून ४२ गावांतील बांधकाम परवाने, लेआऊट मंजुरी, इमारत पूर्णत्वाचा दाखला देणे, मूलभूत सुविधा निर्माण करण्याची कामे केली जातात. मात्र कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. कार्यालयात दलाचा वावर इतका असतो की अधिकारी, कर्मचारी कोण आणि दलाल कोणे हे स्पष्ट होत नाही. सध्या कार्यालयात संतोष, अजितकुमार, घुणके, राजू, इंद्रजित, अशोक अशा सहा दलालांची चलती आहे. या दलालांनी लेटाऊटचा दर कमीत कमी २० हजार काढला आहे. बांधकाम परवान्यासाठी पाच ते दहा हजार रुपयांचा ढपला पाडला जात आहे. ‘साहेबांचीही वरकमाई चांगली होत असल्याने दलालांना अभय मिळत आहे. नागरीकरण झपाट्याने होत असल्याने प्राधिकरणातील शहराजवळील गावात बांधकाम व्यवसाय तेजीत आहे. यामुळे शेतजमिनीचे प्लॉट पाडून विक्री केले जात आहे. यासाठी ले-आऊट, बांधकाम परवाने, इमारत पूर्णत्वाची कामे वाढली आहेत. ही कामे करून देण्यासाठी साहेबांचे नाव सांगून दलाल जोरदार ढपला पाडत आहेत. त्याचा सर्वाधिक फटका पारदर्शकपणे काम करून घेणाऱ्यांना बसत आहे. दलालांकडून आलेली फाईल वेगाने पुढे सरकते आणि पैसे न देता काम करून घेणाऱ्यांची फाईल गहाळ होते, असा कटू अनुभव अनेकांना येत आहे.

दुभत्या म्हशीच्या लाथा गोड म्हणूनदलालांकडून मलिदा चांगला मिळत असल्याने साहेबही मूग गिळून गप्प अशीही चर्चा आहे. त्यांना दुभत्या म्हशीच्या लाथा गोड लागतात म्हणूनच ते दलालमुक्त कार्यालय करीत नाही, असाही आरोप होत आहे.

२५ लाखांची टोपीप्राधिकरणाच्या हद्दीतील गावातील शेत जमीन खरेदी करून त्यांचे प्लॉटिंग करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास सहामधील एका दलालाने २५ लाखांची टोपी घातली आहे. या प्रकरणात काही बोगस गुंठेवारीच्या कामाचाही समावेश आहे.

ज्यांच्या कामात त्रुटी आहेत त्यांनी इंजिनिअर व आर्किटेक्ट यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. दलाल, मध्यस्त का स्वत:हून येतात का? त्यांना थोडीच समाजसेवा करायची आहे? - संजयकुमार चव्हाण, उपसंचालक, प्राधिकरण, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर