जयसिंगपूर : हेरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या शाळा परिसर चौकात एलईडी हायमास्ट दिवे बसविण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापासून याठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत होती. दरम्यान, हायमास्ट दिवे बसविल्यामुळे परिसर उजळून निघाला आहे.
-----------------------
हेरवाडच्या आदेशची भारतीय सैन्यदलात निवड
शिरोळ : हेरवाड (ता. शिरोळ) येथील आदेश सुरेश कडाळे (वय २०) याची भारतीय सैन्यदलात मराठा बटालियन जीडी सोल्जर या पदावर निवड झाली आहे. या निवडीमुळे हेरवाडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. आदेश हा कुरुंदवाड येथील एस. के. पाटील महाविद्यालयात बी ए भाग २ मध्ये शिक्षण घेत आहे. चार वर्षापासून तो आर्मी भरतीसाठी सराव करीत होता. या यशाने त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याने १३ डिसेंबरला बेळगाव येथे शारीरिक चाचणी परीक्षा दिली होती. तर २८ मार्च रोजी लेखी परीक्षेत यश मिळवून त्याने हे यश संपादन केले. त्याला आजोबा आकाराम कांबळे यांच्यासह आई, वडील, भाऊ यांचे प्रोत्साहन मिळाले.
फोटो - १९०५२०२१-जेएवाय-०१-आदेश कांबळे
---------------------
गतिरोधक बसवा
कुरुंदवाड : कुरुंदवाड ते मजरेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील लक्ष्मीनगर वसाहतीकडे जाणाऱ्या वळणावर गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. मुख्य डांबरी मार्गावरून भरधावपणे वाहनांची ये-जा सुरु असते. त्यामुळे वळण घेत असताना अपघाताची शक्यता आहे. तरी या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.