शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदलात नोकरीसाठी तिघांना २१ लाख ५० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 10:39 IST

Crimenews Kolhapur-सैन्यात नोकरी लावतो म्हणून शिवाजी विद्यापीठातील पहारेकऱ्याने तिघा तरुणांची एकूण २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली. त्याने तरुणांकडून पैसे घेऊन भारतीय सेनेचा लोगो व सही शिक्का असलेले बनावट ओळखपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजी भगवान फड (मूळ लातूर, सध्या पुणे) याच्यासह तिघांनी राजारामपुरी पोलिसांत सोमवारी सायंकाळी तक्रार दिली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील पहारेकऱ्यास अटक बनावट ओळखपत्र, नियुक्तीपत्रे देऊन फसवणूक

कोल्हापूर : सैन्यात नोकरी लावतो म्हणून शिवाजी विद्यापीठातील पहारेकऱ्याने तिघा तरुणांची एकूण २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली. त्याने तरुणांकडून पैसे घेऊन भारतीय सेनेचा लोगो व सही शिक्का असलेले बनावट ओळखपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजी भगवान फड (मूळ लातूर, सध्या पुणे) याच्यासह तिघांनी राजारामपुरी पोलिसांत सोमवारी सायंकाळी तक्रार दिली.संशयित शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी कृष्णात पोवार (मुक्काम पोस्ट कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली, तसेच त्याचा साथीदार रोहित मारुती मुळीक (मु. पो.भादवण, ता. आजरा, जि.कोल्हापूर) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला.तक्रारदार शिवाजी फड हा मित्र नवनाथ मुंडे (रा.बीड), संग्राम राठोड (जि. नांदेड), रहिम पीरवाले (उदगीर, जि.लातूर) यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी पोवारला भेटले. त्यावेळी त्याने, रोहित मुळीक याच्या मदतीने परीक्षा न देता त्यांना थेट कॉन्टेन्मेंट बोर्डामध्ये नोकरीचे नियुक्तीपत्र देतो, सांगून प्रत्येकाकडे आठ लाखांची मागणी केली. पीरवाले याने तानाजीला पैसे दिल्यानंतर त्याला त्याच दिवशी सैन्यात नोकरीचे नियुक्तीपत्र दिले.दि. ३ ऑक्‍टोबर २०१९ ला संग्राम राठोडने सात लाख रुपये, शिवाजी फड व नवनाथ मुंडे यांच्यासाठी दोघांच्या नातेवाईकांनी तानाजीकडे एकूण १६ लाख रुपये तानाजीकडे दिले. त्यांनाही नियुक्तीपत्रे दिली. शिवाजीसह संग्राम, नवनाथ यांना आर्मी कॅम्प (झांशी) येथे हजार राहण्यास सांगितले. दि. १४ ऑक्टोबर २०१० ला तिघे झांशी येथे पोहोचले. तेथे वीरेंद्र नावाच्या तरुणाने त्यांना कॉन्टोन्मेंट बोर्डचे फोटो, शिक्का, सही व नाव-नंबर असलेले ओळखपत्र तिघांना दिले.

वीरेंद्रने शिवाजी आणि नवनाथला आर्मी कॅम्पमध्ये नेऊन दोघांकडून कॅम्पमध्ये कचरा काढणे, रंगरंगोटी काढण्याची कामे करून घेतली. त्यामुळे शिवाजीला फसल्याचा संशय आला. त्याने तानाजीला फोनवर संपर्क साधला पण त्याने तो टाळला, त्यामुळे तिघेही झांशीहून गावी परतले. त्यांनी दि. सप्टेंबर २०१९ पासून आजपर्यंत फसवणूक झाल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान धुगे करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर