शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

लाच प्रकरणाने पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 00:11 IST

नांगरे-पाटील प्रबोधन करणार का? : शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षही आश्चर्यकारकच

अतुल आंबी ल्ल इचलकरंजी येथील एका मोठ्या पोलिस ठाण्याचा प्रमुख अधिकारी महिन्याचा हप्ता ठरवून मागताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडला आणि पोलिस दलात खळबळ उडाली. या प्रकारामुळे पोलिस खात्याची अब्रू मात्र चव्हाट्यावर आली. एकीकडे व्याख्याने देऊन समाजाचे प्रबोधन करू पाहणारे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आता पोलिस दलात प्रबोधन करून अशा प्रवृत्तीला आळा घालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांमध्ये इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाणे गणले जाते. याआधी अनेक अधिकारी या पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारण्यासाठी धडपडत होते. त्याचे मुख्य कारण यानिमित्ताने पुढे येत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यावसायिक, क्लबचालक, मटकाकिंग, गुटखाकिंग, गावठी दारू विक्रेते अशा अनेक लहान-मोठ्या माशांना गळाला लावून महिन्याला ‘कलेक्शन’ करणे नियमितपणे सुरू असल्याचे उघड होताना दिसत आहे. या कलेक्शनसाठी विशेष प्रावीण्य असलेला एखादा ‘विष्णू’ अधिकाऱ्यांना हाताशी लागतोच. आपण नामानिराळे राहत त्याच्यामार्फत सर्व माया एकत्रित केली जाते, हे आता स्पष्ट होत आहे. पोलिस अशा कामांसाठी काही झीरो पोलिस, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांना नेमून हा स्वतंत्र कारभार चालवतात. अशा कार्यकर्त्यांची माहिती गेल्या महिन्यात मागविण्यात आली. त्यावेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असती तरी अशा बेअब्रूपणाला थोडा तरी लगाम लागला असता. मात्र, वरिष्ठांचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही ‘आश्चर्यकारकच’ म्हणावे लागेल. पोलिस निरीक्षक गायकवाड यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच डॅशिंग पद्धतीने सुरू झाली. तीन महिन्यांत त्यांनी बराच ठसा उमटविला. मात्र, अशा एखाद्या ‘विष्णू’च्या भूलभुलैयाला बळी पडल्याने त्यांना कारवाईलासामोरे जावे लागले. त्यांचा अतिआत्मविश्वास नडल्याचे पोलिस ठाण्यात बोलले जात होते. पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवावा व सर्वसामान्य नागरिकांशी सलोख्याने वागावे, असे आदेश वरिष्ठांकडून आहेत. मात्र, पोलिस ठाण्यात नेमके याउलट घडते. गुन्हेगारांशी मैत्रीचे नाते घट्ट करत त्यांच्याशी सलगी करून आपला फायदा करून घेण्यातच पोलिसांना रस दिसतो. यामध्ये एखादा प्रामाणिक पोलिस मध्ये आलाच तर त्याला दुसऱ्याच कामावर नेमले जाते. त्याच्यावर होणारा अन्याय सरळपणे दिसतो. मात्र, कोणीच काही करू शकत नाही. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नांगरे-पाटील यांनी पोलिस दलाचे प्रबोधन करत त्यांना भटकटलेल्या मार्गावरून पुन्हा रूळावर आणणे गरजेचे बनले आहे. ‘आ बैल मुझे मार’ गुटख्याचे अनेक गुन्हे दाखल असलेला पाच्छापुरे हा ‘लाचलुचपत’ विभागाला तक्रार करून अडकवितो, ही माहिती सर्वांना माहीत आहे. कारण याआधी त्याने सातजणांना अडकविले आहे. त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई करायची सोडून त्याच्याकडे हप्ता (लाच) मागण्याचे धाडस म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ या म्हणीप्रमाणेच असल्याचे दिवसभर पोलिस वर्तुळात बोलले जात होते