शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 17:04 IST

राधानगरी तालुक्यातील धामणी धरण प्रकल्पाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडले आहे. जोपर्यंत हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय धामणी खोरा विकास कृती समितीतर्फे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे निदर्शने केली. ‘धामणी खोऱ्याचा एकच निर्धार...मतदानावर बहिष्कार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

ठळक मुद्दे धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन : प्रकल्पाचे काम रखडले

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी धरण प्रकल्पाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडले आहे. जोपर्यंत हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय धामणी खोरा विकास कृती समितीतर्फे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे निदर्शने केली. ‘धामणी खोऱ्याचा एकच निर्धार...मतदानावर बहिष्कार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.दुपारी बाराच्या सुमारास धामणी खोऱ्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी निदर्शने करून शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले. त्यासोबत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांनी केलेले ठरावही सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांसाठी वरदायिनी असलेल्या धामणी प्रकल्पाचे काम गेल्या अठरा वर्षांपासून रखडले आहे. हा प्रकल्प अपूर्ण असल्याने धामणी खोऱ्याचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. त्यामुळे या भागात अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा बसत आहेत. शेती किंवा शेतीपूरक व्यवसायही करणे अवघड झाले आहे.

यासाठी निवेदने, मोर्चे, आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्याने हा प्रकल्प ‘जैसे थे’च स्थितीत आहे. त्यामुळे जोपर्यंत या प्रकल्पाचे काम सुरूहोत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय शेतकऱ्यानी घेतला आहे.आंदोलनात सर्जेराव पाटील, गजानन चौधरी, राजेंद्र सावंत, रामदास चौगले, विलास बोगरे, ज्ञानदेव पाटील, महिपती चौधरी, पांडुरंग पाटील, रघुनाथ पाटील यांच्यासह धामणी खोऱ्यातील शेतकरी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर