शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिकेचा तळ लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:41 IST

कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यांपासून अंबाबाई भक्त, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते त्या मणिकर्णिका ...

कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यांपासून अंबाबाई भक्त, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते त्या मणिकर्णिका कुंडाचा तळ गुरुवारी लागला. कुंडाचा १४ बाय १८ आकाराचा चौकोनी तळ प्रकाशात आला असून त्यात सध्या परिसरातील तीन गटारींचे पाणी मिसळत आहे. या पाण्याचा उपसा सुरू असला तरी गटारींचे पाणी बंद करणे गरजेचे आहे तोपर्यंत पाण्याचे उमाळे नेमके कुठून येत आहेत हे कळणार नाही व कुंडातील पाणी स्वच्छ राहणार नाही.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू आहे. कोणत्याही मशीनरींचा वापर न करता केवळ पाटी व खोऱ्याने ४० फूट खोल असलेल्या या कुंडाची खुदाई होत असली तरी सध्या कामाने गती घेतली आहे. गेली कित्येक महिने कुंडातील भराव काढण्यात गेले. मात्र इतके दिवस झालेल्या श्रमाचे फलित म्हणून बुधवारी सायंकाळी कुंडाचा तळ लागला. मात्र सध्या यात महापालिकेची सरलष्कर भवन येथून आलेल्या गटारींचे पाणी, माऊली लॉजच्या गटारींचे लिकेजचे पाणी, मंदिर आवारातील पाणी आणि जोतिबा रोडवरील इमारतीत मुरलेले पाणी मिसळत आहे. त्यादिवसापासून येथील पाण्याचा उपसा केला जात असून रात्रीत पुन्हा पाणी भरत आहे.

गटारींचे पाणी कुंडात मिसळणे बंद होत नाही तोपर्यंत कुंडात पाणी नेमके कुठून येते, झरे जिवंत झाले आहेत, पाण्याचे उमाळे कुठे आहेत याचा शोध लागणार नाही.

---

महापालिकेची दिरंगाई... देवस्थानचा इशारा

महापालिकेने नागरी वस्तीतील ड्रेनेजची, गटारींची पाईपलाईन पूर्व दरवाज्यातून मंदिरात आणली आहे. हे घाण पाणी कुंडात मिसळत असून गेल्या नऊ महिन्यांपासून देवस्थान समितीने वारंवार मागणी करूनदेखील ही पाईपलाईन पूर्व दरवाज्याबाहेरून वळवण्यात आलेली नाही. याबाबतच्या प्रस्तावावर आयुक्तांची सही होऊनही महपालिकेने निविदा काढलेली नाही. यावरून वाद झाल्यानंतर समितीने तुम्ही पाईपलाईन वळवणार नसाल तर आम्ही मंदिरातून ती बंद करू, पुढे पाणी तुंबले, नागरिकांना त्रास झाला तर त्याला देवस्थान जबाबदार नाही, असा इशारा दिला आहे.

--

किमान दहा फूट पाणी

सध्या कुंडातील पाण्याची पातळी ३ फूट आहे. भालजी पेंढारकर यांच्या आत्मचरित्रात ते घाटी दरवाजा येथून उडी मारून कुंडात पोहायचे असा उल्लेख आहे. कुंडाच्या चौकोनाबाहेर आणखी किमान ७ फूट वरपर्यंत कुंडाचे पाणी होते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

----

फोटो नं ११०३२०२१-कोल-मणिकर्णिका कुंड

अेोळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुंडाचा तळ नऊ महिन्यांच्या अविश्रांत प्रयत्नांनंतर गुरुवारी लागला. कुंडात गटारींचे पाणी मिसळत असल्याने सध्या पाण्याचा उपसा सुरू आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)

---