शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याच्या वाहिनीतून निघाल्या बाटल्या, चपले, गोणपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:55 IST

Water MuncipaltyCarporation Kolhapur : फुलेवाडी रिंग रोडवरील तब्बल १४ कॉलन्यांचा पाणीपुरवठा गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद होता. नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. रस्त्यावर दोन ठिकाणी केलेल्या खुदाईनंतर पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीत प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, गोणपाट आदी अडकून पडल्याचे आढळले. या जलवाहिनीत अशा प्रकारचा कचरा अडकून वारंवार पाणीपुरवठा खंडित होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, हा कचरा जलवाहिनीत कोठून येतो, याचा पाणीपुरवठा विभागाने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठ्याच्या वाहिनीतून निघाल्या बाटल्या, चपले, गोणपाट फुलेवाडी रिंग रोडवरील प्रकार : १४ कॉलन्यांत पाणीटंचाई; दोन ठिकाणी खुदाई

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवरील तब्बल १४ कॉलन्यांचा पाणीपुरवठा गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद होता. नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. रस्त्यावर दोन ठिकाणी केलेल्या खुदाईनंतर पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीत प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, गोणपाट आदी अडकून पडल्याचे आढळले. या जलवाहिनीत अशा प्रकारचा कचरा अडकून वारंवार पाणीपुरवठा खंडित होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, हा कचरा जलवाहिनीत कोठून येतो, याचा पाणीपुरवठा विभागाने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.फुलेवाडी रिंग रोडवरील बहुतांशी कॉलन्यांमध्ये गेल्या आठवडाभर पाणीपुरवठा खंडित झाला होता. भागातील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, नागदेववाडीचे ग्रामपंचायत सदस्य समीर पोवार, माजी सरपंच मंगेश गुरव, माजी सदस्य दीपक माळवदे, विजय तायशेटे यांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून पाणीपुरवठा सुरळीत केला. रिंग रोडवर अयोध्या कॉलनी व बोंद्रेनगर येथे खुदाई केल्यानंतर जलवाहिनीत चपला, बाटल्या, गोणपाट आदी कचरा मिळून आला.

जलवाहिनीतील हा कचरा काढण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीने याच जलवाहिनीतून कचरा बाहेर काढला होता. वारंवार उद्‌भवणाऱ्या समस्यांना नागरिक त्रासले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत हा कचरा कोठून येतो? याचा महापालिकेने शोध लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.कॉलनीतील पाणीपुरवठा खंडितगजानन कॉलनी, अयोध्या कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, ग्रामसेवक पार्क, महालक्ष्मी पार्क, तसेच सद्‌गुरू कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, सोनाई पार्क, शिवशक्ती कॉलनी, भोगम पार्क, गणेश पार्क, महेश्वर कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी या कॉलन्यांतील पाणीपुरवठा खंडित झाला.बिल्डर, पदाधिकाऱ्यांचे लाडपरिसरात सर्व कॉलन्यांत रिंग रोडवरील ४ इंची जलवाहिनीतून पाणी कनेक्शन दिली आहेत; पण काही बांधकाम व्यावसायिकांनी रिंग रोडवरून गेलेल्या १६ इंची या मुख्य जलवाहिनीवरून पाणी कनेक्शन घेतली आहेत. काहींनी आपल्या फार्म हाऊससाठीही याच मुख्य जलवाहिनीवरून पाणी कनेक्शन घेतली आहेत; पण महापालिकेच्या डोळेझाक कारभारामुळे याची वाच्यता करण्यास कोणीही तयार नसल्याची परिसरात चर्चा आहे. 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर