शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस फिफ्टी-फिफ्टी !

By admin | Updated: August 28, 2014 00:23 IST

१५०-१३८ फॉर्म्युला निश्चित : ‘उत्तर’ , ‘शिरोळ’वर राष्ट्रवादीचा दावा

राजाराम लोंढे - कोल्हापूर --काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार हे निश्चित असून, राष्ट्रवादी काँग्रेसला १३८ जागा देण्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. वाढीव जागांमध्ये कोल्हापूर जिल्ह्णात दोन जागा काँग्रेसने सोडाव्यात, असा प्रस्तावही राष्ट्रवादीकडून पुढे केला आहे. दहापैकी चंदगड, कागल, राधानगरीसह कोल्हापूर उत्तर व शिरोळ मतदारसंघावर दावा सांगितला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने गेले दोन महिने स्वबळाची भाषा करत जागा कमी-जास्त करण्याबाबत ताठर भूमिका घेतली होती. त्यामुळे आघाडी होणार की स्वबळावर लढावे लागणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था पसरली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेचा निकष लावत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या दहा जागा कमी केल्या होत्या. हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादीने सुरुवातीपासून निम्या जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यावर दोन्ही काँग्रेसमध्ये अनेकवेळा बैठका होऊन १३८ जागांवर एकमत झाले आहे. वाढीव जागांमध्ये जिल्ह्णातील कोल्हापूर उत्तर, शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी मतदारसंघांची अदला-बदल होऊ शकते. ‘उत्तर’मधून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी आपल्या उमेदवारीबाबत संकेत न दिल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. शेवटच्या क्षणी हा मतदारसंघच सोडला जाऊ शकतो. शिरोळमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने ही जागा काँग्रेस सहजासहजी सोडण्याची शक्यता कमी आहे पण येथून ज्येष्ठ नेते आमदार सा. रे. पाटील पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता फारच धूसर आहे, त्यातच राष्ट्रवादीकडे येथून ताकदीचा उमेदवार असल्याने हा मतदारसंघ द्यावा, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू झाला आहे. शाहूवाडीचे आमदार विनय कोरे हे राष्ट्रवादीचे मित्र आहेत. त्यांच्याविरोधात थेट शड्डू ठोकणे राष्ट्रवादीला जिल्ह्णातील पुढील निवडणुकीत अडचणीचे ठरू शकते. हातकणंगलेमधून काँग्रेसतर्फे माजी मंत्री जयवंतराव आवळे लढणार आहेत. त्यांनी तयारी सुरू केल्याने हाही मतदारसंघ काँग्रेस सोडणे अशक्य आहे. राष्ट्रवादीच्या वाढीव दोन जागांपैकी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक जागा मिळावी, तेही हातकणंगले किंवा शिरोळ यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. पण काहीही झाले तरी जिल्ह्णात दोन्ही काँग्रेस फिफ्टी-फिफ्टी जागांवर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.