शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन्हीकडे उमेदवार हीच पवार यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:15 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या कोल्हापूर आणि सातारा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने हुकमी विजयाच्या आहेत; परंतु तिथे विद्यमान खासदार अनुक्रमे धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले यांना पक्षांतूनच विरोध सुरू झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यादृष्टीने ती एक नवी डोकेदुखी झाली आहे; पण पवार या दोन्ही उमेदवारांना बदलण्याच्या ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या कोल्हापूर आणि सातारा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने हुकमी विजयाच्या आहेत; परंतु तिथे विद्यमान खासदार अनुक्रमे धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले यांना पक्षांतूनच विरोध सुरू झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यादृष्टीने ती एक नवी डोकेदुखी झाली आहे; पण पवार या दोन्ही उमेदवारांना बदलण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. सेफ गेमचे राजकारण ते करीत असल्याचे चित्र दिसत आहे.कोल्हापुरात गेल्या निवडणुकीत पवार यांनी धनंजय महाडिक यांना संधी दिली. देशात काँग्रेसविरोधी लाट असतानाही दोन्ही काँग्रेसची एकत्रित मूठ, महाडिक गटाची ताकद यामुळे ते विजयी झाले; परंतु लोकसभेला ज्यांचा पाठिंबा घेतला त्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याच विरोधात त्यांनी विधानसभेला रणशिंग फुंकले व त्यात पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे आमदार पाटील हे या लोकसभेला खासदार महाडिक यांच्या पराभवासाठी ताकद पणाला लावणार हे स्पष्टच आहे; याचबरोबर महाडिक यांना स्वपक्षांतूनही विरोध आहे. आज पक्ष एका बाजूला व महाडिक दुसऱ्या बाजूला असे चित्र आहे. पक्षाचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यातही राजकीय संघर्ष सुरू आहे. म्हणूनच तर खा. महाडिक अध्यक्ष असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत चक्क मुश्रीफ यांच्या निषेधाचा ठराव झाला व त्याची प्रतिक्रिया म्हणून मुरगूडला महाडिक यांचा निषेध झाला. पक्षांतूनच असा विरोध असूनही पवार या वेळेला कोल्हापूरचा उमेदवार बदलतील का? याचे उत्तर नाही असेच आहे; कारण बदलूनही उमेदवारी द्यायची कुणाला? हा प्रश्न आहेच; शिवाय महाडिक यांनी खासदार म्हणून चांगली छाप पाडली आहे; त्यामुळे मुश्रीफ यांचीच समजूत काढून महाडिक यांनाच बळ द्यायचे धोरण पवार यांचे दिसते.उदयनराजेंच्या उमेदवारीस टोकाचा विरोधसातारा लोकसभा मतदारसंघातही खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीस पक्षांतूनच टोकाचा विरोध आहे. तिथेही पक्ष एका बाजूला व खासदार दुसºया बाजूला, अशी विभागणी झाली आहे. सहापैकी चार ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत व त्यांचा विद्यमान खासदारांना विरोध आहे. उदयनराजेंचे हुकूमशाहीसारखे वागणे पक्षाच्या नेत्यांना मान्य नाही. गेल्या निवडणुकीतही एकास एक लढत व सक्षम उमेदवार नसल्याने ते निवडून आले. या निवडणुकीत पवार यांच्यापुढे त्यांच्याऐवजी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रामराजे निंबाळकर असे उमेदवारांचे पर्याय आहेत. पक्षाची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आहे; परंतु पवार उमेदवार बदलण्याच्या मन:स्थितीत नाहीत, कारण उदयनराजे भाजपकडे गेल्यास ही हक्काची जागा त्रासदायक ठरू शकेल, अशी भीती त्यांना वाटते.