शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

बोरवडेत नेत्यांच्या वारसदारांची ‘काँटे की टक्कर’

By admin | Updated: February 17, 2017 01:01 IST

राजकारणाची दिशा ठरविणारी लढत : भूषण पाटील यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात मोठी चुरस

रमेश वारके-- बोरवडे बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक अत्यंत अटीतटीची बनली असून, राजकारणाची दिशा ठरविणारी लढत म्हणून या मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जात आहे. शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रा. संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र, राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून बिद्रीचे माजी उपाध्यक्ष गणपराव फराकटे यांचा मुलगा मनोज, भाजपकडून प्रताप पाटील, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील गटाकडून अपक्ष म्हणून बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून यापूर्वी प्रतिनिधित्व केलेले कागलचे उपसभापती भूषण पाटील, यांच्यासह शेतकरी कामगार आघाडी तर्फे किशोर चौगले निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात ‘कॉँटे की टक्कर’ अशी लढत होत आहे. राजकीय नेत्यांच्या वारसदारांची ही निवडणूक नेत्यांची प्रतिष्ठा बनली असून, वारसदारांच्या या लढाईत कोण बाजी मारणार?याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. टोकाचे राजकारण व कार्यकर्त्यांची ईर्षा यामुळे इथले राजकारण नेहमीच संघर्षमय असते. प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आमदार हसन मुश्रीफ, राजे समरजित घाटगे, बाबासाहेब पाटील या सर्व गटांची ताकद हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य होय.स्व. सदाशिवराव मंडलिकांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय प्रवासात या मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचा गट आहे. या गटाच्या माध्यमातून त्यांनी वीरेंद्र यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यांच्या मताधिक्यासाठी या गटाने कंबर कसली आहे. माजी आमदार संजयबाबा घाटगे व शिवसैनिकांची वीरेंद्रला साथ मिळत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता सोडून इतर कोणतीही सत्ता नसताना गेली अनेक वर्षे संजयबाबा घाटगे यांचा गट या मतदारसंघात प्रबळ आहे. या निवडणुकीत सध्या प्रा. संजय मंडलिक व संजयबाबा घाटगे यांची शिवसेनेच्या माध्यमातून युती आहे. बोरवडे हा आमदार हसन मुश्रीफ यांचा बोलकिल्ला समजला जातो. अनेक वर्षे आमदारकी व मंत्रिपदाच्या काळात मुश्रीफ यांनी येथे आपली अभेद्य अशी कार्यकर्त्यांची गावागावांत राजकीय ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान आहे. राजे विक्रमसिंह घाटगे गटही या मतदारसंघात प्रभावी आहे. बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांची राजकीय ताकदही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचाही प्रभाव मतदारसंघात आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याची घेतलेली भूमिका निर्णायक मानली जात आहे. तर प्रत्येक निवडणूक लढविणारे पी. टी. चौगले हे आपल्या मुलग्यासाठी जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बोरवडे मतदारसंघात शिवसेनेला प्रा. संजय मंडलिक व संजय घाटगे यांच्यासह शिवसैनिकांनीची ताकद मिळत आहे. तर मुश्रीफ, राजे व बाबासाहेब पाटील गट स्वतंत्र लढत आहेत. विद्यमान उपसभापती भूषण पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याने बंडखोरी करून पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या उमेदवारीने बोरवडे मतदारसंघात चुरस आहे. बंडखोरीचा फायदा कुणाला बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेने तिकिट नाकारलेल्या व अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या उपसभापती भूषण पाटील यांच्या उमेदवारीने फायदा कुणाला व फटका कुणाला बसणार यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.गटांची ताकद पणाला बोरवडे मतदारसंघात सर्वच गटांची ताकद आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे हे दोन गट एकत्रित, तर आमदार हसन मुश्रीफ, शाहूचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बाबासाहेब पाटील हे गट स्वतंत्रपणे गटाच्या अस्तित्वाच्या ताकदीसाठी लढत आहेत. निकालानंतर कोणाची ताकद किती हे समजणार आहे.