शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बोचऱ्या वाऱ्याने अंगाला हुडहुडी!

By admin | Updated: October 27, 2014 00:26 IST

पावसाची भुरभुर : ढगाळ वातावरणामुळे निरुत्साह; जिल्ह्यात सरासरी ३३.०१ मिलिमीटर पाऊस

कोल्हापूर : रात्रभर पावसाच्या सरी, सकाळपासून अंगाला झोंबणारा वारा व पुन्हा पावसाची भुरभुर असे ढगाळ , निरुत्साही वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर राहिले. दिवसभर हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने आबालवृद्ध अक्षरश: आकसून गेले होते. स्वेटर, कानटोपीने पूर्ण अंग झाकून घेऊनच नागरिक बाहेर पडत होते. अंग गारठविणारा वारा, त्यात खराब वातावरणासह पावसाची भुरभुर दिवसभर सुरू होती.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यात गेले दोन दिवस पाऊस सुरू आहे. काल, शनिवारी मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळला. पावसाबरोबर हवेत कमालीचा गारठा आहे. अंगाला झोंबणारा वारा दिवसभर वाहत असल्याने अंग अक्षरश: गारठून जात आहे. आज रविवार असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची चांगलीच गोची झाली होती. खराब हवामानामुळे सर्वत्र निरुत्साही वातावरण होते. गाडीवरून जाताना विशेषत: लहान मुलांना त्रास जाणवत होता. दिवसभर हुडहुडी राहिल्याने त्याचा परिणाम कामकाजावर झाला. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३३.०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा वगळता सर्वच तालुक्यांत रात्री दमदार पाऊस झाला. या पावसाने काढणीस आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रोपलागणीचे भात, ज्वारी अडकली आहे. अनेक ठिकाणी भातपिके भुईसपाट झाली असून, भाताच्या लोंब्या पाण्यात पडल्याने त्यांना मोड येत आहेत, तर मळणी करून घरात आणून ठेवलेले भात सुकवायचे कोठे असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे. गुऱ्हाळघरांवरही पावसाचा परिणाम झाला असून, जळण भिजल्याने गुऱ्हाळघरे बंद आहेत. खराब हवामानाचा गुळाच्या प्रतीवर परिणाम होत असल्याने गाळप करण्याचे धाडसही शेतकरी करीत नाहीत. या पावसाचा खरीप पिकांना फटका बसला असला तरी ऊस, रब्बी पिकांसाठी तो पोषक ठरत आहे. साखर कारखान्यांच्या हंगामाला अजून महिना असल्याने उसासाठी पाऊस पोषक ठरत आहे. माळरानावरील भुईमूग, भात काढणीनंतर पेरलेल्या ज्वारी, हरभरा पिकांना दिलासा देणारा पाऊस आहे. चोवीस तासांतला पाऊस मिलिमीटरमध्ये असा -करवीर - २६.८९, कागल - ३१.५७, पन्हाळा - २४.४२, शाहूवाडी - १७, हातकणंगले - २२.५७, शिरोळ - २३.२८, राधानगरी - २२.६७, गगनबावडा - ४.५०, भुदरगड - ५४.४०, गडहिंग्लज - ५०.५७, आजरा - ५४, चंदगड - ६४.५०.गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसाला कमालीचा गारठा असून, रविवारी दिवसभर अंगात हुडहुडी भरविणारा बोचरा वारा असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील झाले. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पंचगंगा घाटावरून टिपलेले छायाचित्र.