शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदानासाठी धावते तासगावची ‘बॉम्बे ओ’ एक्स्प्रेस

By admin | Updated: April 7, 2017 00:21 IST

जीवनदानासाठी धावते तासगावची ‘बॉम्बे ओ’ एक्स्प्रेस

अविनाश कोळी ल्ल सांगलीमाणुसकीची आणि मदतीची भावना एखाद्याच्या रक्तातच असावी लागते, असे म्हणतात. दुर्मिळ रक्तगटाचा एक दाता स्वत:च्या जिवापेक्षाही दुसऱ्याच्या जिवाचा विचार करत दररोज अंगातील रक्तासारखाच धावतो आहे. अत्यंत दुर्मिळ असलेल्या रक्तगटाचे रक्त देऊन त्याने तब्बल ४२ जणांचे प्राण वाचविले आहेत. जीवनाच्या रुळावर प्राणपणाने धावणाऱ्या या एक्स्प्रेसचे नाव आहे विक्रम यादव. तासगाव (जि. सांगली) येथील बेताचीच परिस्थिती असलेल्या कुटुंबातील हा कर्ता पुरुष. भिलवडी स्टेशनवरील चितळे डेअरीमध्ये वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या विक्रम यादवने पदरमोड करून लोकांना जीवनदान दिले आहे. यामुळे अनेकदा घरातील आर्थिक परिस्थिती आणखी बिकट बनली, तरीही जीवनदान मिळालेल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून यादवांचे कुटुंब मनाने श्रीमंत बनले आहे. दोनच दिवसांपूर्वी यादव यांनी स्वत:च्या जिवाची परीक्षा घेत रत्नागिरीतील एका बाळ-बाळंतिणीला वाचविले. करबुडे गावात चिरेखाणीवर काम करणाऱ्या व जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी २ एप्रिलला दाखल झालेल्या अंजली सचिन हेळकर (रा. मूळ सोलापूर) या महिलेच्या रक्तात हिमोग्लोबीन अत्यंत कमी आढळले. त्यांच्यात अत्यंत दुर्मिळ असा ‘बॉम्बे ओ’ रक्तगट आढळून आला. या गटाचे रक्तच उपलब्ध नसल्याने दात्यापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न होता. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर यांनी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून रक्तदात्यांना आवाहन केले. या आवाहनाला सर्वात पहिला प्रतिसाद तासगावच्या विक्रम यादव यांनी दिला. ३ एप्रिलरोजी सायंकाळी कामावरून परतल्यानंतर त्यांनी रत्नागिरीला जाणाऱ्या बसची चौकशी केली. पण रात्री एकही बस नसल्याचे त्यांना कळाले. मग त्यांनी मोटारसायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला. आजवर मुलाच्या मागे डोंगरासारखे उभे राहणाऱ्या यादव यांच्या आई-वडिलांनी त्यांना सांगितले की, दुचाकी मिळाली नाही, तर सायकलने जा, पण त्या बाळंतिणीचा जीव वाचला पाहिजे. आई-वडिलांच्या या ताकदीने त्यांनी रात्रीच मित्रासोबत रत्नागिरीकडे मार्गक्रमण केले. मध्यरात्री दोन वाजता ते तेथे पोहोचले. सकाळी त्यांनी तेथे रक्तदान केले. अंजली यांना मुलगा झाला. मात्र हेळकर दाम्पत्याला सर्वाधिक कौतुक जन्माला आलेल्या बाळापेक्षा, जिवासाठी धावणाऱ्या या दात्याचे वाटले.काय आहे ‘बॉम्बे ओ’?बॉम्बे ब्लड ग्रुपला ‘ओएच’ म्हणूनही ओळखले जाते. या रक्तगटाचा शोध १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरांनी पूर्वीच्या मुंबईमध्ये अर्थात बॉम्बेमध्ये लावला, म्हणून त्याला बॉम्बे हे नाव पडले. आपण सर्वजण असे समजतो की, ‘ओ निगेटिव्ह’ हा रक्तगट सर्वात दुर्मिळ असतो. कारण तो फारच कमी लोकांमध्ये आढळतो. पण, ‘ओ निगेटिव्ह’पेक्षाही ‘बॉम्बे ब्लड’ ग्रुप दुर्मिळ रक्तगट मानला जातो. हा रक्तगट जगाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ०.०००४ टक्के लोकांमध्येच आढळतो. दर दहा लाख लोकांच्या मागे केवळ चारजण या रक्तगटाचे सापडतात. इतका हा दुर्मिळ आहे. या प्रकारच्या रक्तगटामध्ये असणारा ‘अँटीजन एच’ हा घटक, याच्या दुर्मिळ असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हा घटक अन्य कोणत्याही रक्तगटात आढळत नाही. म्हणून धावतात विक्रम...ही घटना आहे १९९५ मधील. एका अपघातात विक्रम यादव यांचा जवळचा मित्र जीवन-मरणाच्या कुंपणावर अडकला होता. त्याचा रक्तगटही ‘बॉम्बे ओ’ होता. मात्र त्यावेळी त्यांना त्यांच्या रक्तगटाची कल्पना नव्हती. रक्ताअभावी या मित्राचा मृत्यू झाला. त्यानंतर काही महिन्यांनी आणखी एका मित्राच्या आईला रक्त देण्यासाठी विक्रम मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरनी विक्रम यांचा रक्तगट ‘बॉम्बे ओ’ असल्याचे सांगितले आणि त्यांचे डोळे पाणावले. काही दिवसांपूर्वी ही गोष्ट कळाली असती, तर मित्राचे प्राण वाचले असते, याची जाणीव त्यांना झाली. हे शल्य आजही त्यांना बोचते आहे. या मित्राला आदरांजली म्हणून विक्रम दुसऱ्याच्या जिवासाठी आता सतत धावत असतात. प्रत्येक जीव वाचल्यानंतर ते त्या मित्राला आदरांजली अर्पण करतात. सोशल ग्रुप‘बॉम्बे ओ’ हा रक्तगट असलेल्या लोकांचा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप बनवून यादव यांनी दुर्मिळ सेतू तयार केला आहे. २३० लोक या ग्रुपमध्ये आहेत. महाराष्ट्रातील ६० ते ६५ जणांचा त्यात समावेश आहे.