शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बोगस डॉक्टर दाम्पत्याचा रुग्णांच्या जिवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:20 IST

एकनाथ पाटील/कोल्हापूर : ताप, थंडी यांवरील उपचारांसह मुलगाच होणार असे ठामपणे सांगून झाडपाल्याच्या औषधासह, इंजेक्शन देण्याबरोबरच गर्भलिंग तपासणीमध्ये निगवे दुमाला (ता. करवीर) येथील बोगस डॉक्टर दाम्पत्य राजरोस रुग्णांच्या जिवाशी खेळत आहे. यासंबंधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार पुराव्यानिशी दाखल झाली आहे. या ‘हिटलिस्ट’ डॉक्टरांवर कारवाईचा स्कॅनर फिरणार कधी? असा ...

ठळक मुद्देनिगवे दुमाला येथील धक्कादायक प्रकार : जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे तक्रार

एकनाथ पाटील/कोल्हापूर : ताप, थंडी यांवरील उपचारांसह मुलगाच होणार असे ठामपणे सांगून झाडपाल्याच्या औषधासह, इंजेक्शन देण्याबरोबरच गर्भलिंग तपासणीमध्ये निगवे दुमाला (ता. करवीर) येथील बोगस डॉक्टर दाम्पत्य राजरोस रुग्णांच्या जिवाशी खेळत आहे. यासंबंधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार पुराव्यानिशी दाखल झाली आहे. या ‘हिटलिस्ट’ डॉक्टरांवर कारवाईचा स्कॅनर फिरणार कधी? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

हालोंडी (ता. हातकणंगले) येथील भरत पाटील या बोगस डॉक्टराच्या मुसक्या आवळल्यानंतर जिल्'ातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. काही डॉक्टरांनी पदवीप्रमाणे होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे; परंतु तसे न करता ते अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करीत आहेत. या डॉक्टरांना त्यांची पत्नीही मदत करते. स्वघोषित ‘डॉक्टर’ ही पदवी लावून पतीच्या गैरहजेरीत त्या दवाखाना चालवितात.

रुग्णाला तपासण्याबरोबर त्याला इंजेक्शनही देण्याचे धाडस त्या करीत आहेत. ग्रामीण भागातील काही लोक अशिक्षित असून, त्यांच्या अज्ञानाचा फायदा हे बोगस डॉक्टर दाम्पत्य घेत आहे. अशा प्रकारे जिल्'ातील ३० पेक्षा जास्त डॉक्टरांचा संशयास्पद कारभार सुरूअसल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.निगवे दुमाला (ता. करवीर) येथील दत्तात्रय शामराव चौगले यांनी दि. ९ मे रोजी गावातील अशाच एका बोगस डॉक्टर दाम्पत्याविरोधात जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

संबंधित डॉक्टराने दवाखान्याबाहेर डॉक्टर पदवीचा फलक लावला आहे. त्याची पत्नी डॉक्टर नसतानाही ती पतीच्या गैरहजेरीत दवाखाना चालविते. ती रुग्णांना इंजेक्शन देतानाची व्हिडीओ क्लिप चौगले यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखल आरोग्य प्रशासनाने अद्यापही घेतलेली नाही. याउलट चौगले यांना संबंधित डॉक्टर व त्याचे नातेवाईक, मित्रांकडून अर्ज माघारी घेऊन प्रकरण मिटविण्यासाठीचे फोन केले जात आहेत. गेले महिनाभर तक्रार अर्ज जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहे. त्याच्यावर कारवाई सोडा, साधी चौकशीही करण्याचे धाडस अधिकाºयांनी केलेले नाही. प्रशासनच अशा बोगस डॉक्टरांना पाठबळ देत असेल तर रुग्णांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास प्रशासनही तितकेच जबाबदार राहणार आहे.