आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १२ : ताराराणी चौकात आराम बसला ओव्हरटेक करताना बसच्या चाकात सापडून बांधकाम मजूराचा मृत्यू झाला होता. शिव चन्नाप्पा दौडमणी (वय २८) असे त्याचे नाव आहे. नातेवाईकांनी सोमवारी सीपीआरच्या शवगृहातून मृतदेह ताब्यात घेवून विजापूरला रवाना झाले. गांधीनगर-निगडेवाडी येथून तो मित्राला घेवून रंकाळा फिरायला येत असताना रविवारी रात्री अपघात झाला. शिव दौडमणी व त्याचा मित्र गौस गौस रियाज तारदोळ (वय २६, रा. बैलहोंगल, जि. बेळगाव) हे निगडेवाडी येथे राहतात. दोघेही बांधकाम मजूरीचे काम करीत होते. शिव पत्नीसह याठिकाणी राहत होता. दोघे रविवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास रंकाळा तलाव येथे फिरण्यासाठी निघाले असताना ताराराणी चौकात नीता ट्रॅव्हल्सच्या आरामबसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना शिवचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो चाकाखाली गेला. यामध्ये त्याच्या अंगावरुन बसचे चाक लावून जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला मित्राने उडी मारल्याने बचावला. पतीच्या अपघाती मृत्यूची बातमी समजाच पत्नीला मानसिक धक्का बसला. शाहूपुरी पोलीसांनी विजापूर येथील नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती कळवली. नातेवाईकांनी सोमवारी पहाटे कोल्हापूरला येवून मृतदेह ताब्यात घेवून ते विजापूरला रवाना झाले.
‘त्या’ मजूराचा मृतदेह विजापूरला हलविला
By admin | Updated: June 12, 2017 13:34 IST