शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

संभाजीनगर परिसरातील वसाहतमधील तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 18:16 IST

गजानन महाराजनगरमधील घटना : संशयित श्रीराम कोगनुळीकर कुटुंबासह पसार

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २७ : मित्राला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या संभाजीनगर येथील वारे वसाहतीमधील तरुणाचा खून झाल्याची घटना गजानन महाराजनगर येथील स्वाती विहार अपार्टमेंटमध्ये बुधवारी (दि. २६) रात्री घडली. अमित सुनील दावणे (वय २३, रा. वारे वसाहत, कोल्हापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी संशयित श्रीराम कोगनुळीकर हा कुटुंबासह पसार झाला आहे. याबाबतची फिर्याद सागर आनंदराव टिपुगडे (वय ३२, रा. स्वाती विहार अपार्टमेंट, एफ ८, दुसरा मजला) यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, स्वाती विहार अपार्टमेंटमधील एस विंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर श्रीराम कोगनुळीकर राहतो; तर दुसऱ्या बाजूला एफ-८ मध्ये सागर टिपुगडे राहतो. पूर्ववैमनस्यातून श्रीराम कोगनुळीकर व सागर टिपुगडे यांच्यात वाद आहे. बुधवारी (दि. २६) या दोघा कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादातून श्रीराम कोगनुळीकर यांचा मुलगा पार्थ याला टिपुगडेने शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर पार्थ कोगनुळीकर याने जुना राजवाडा पोलिसांत टिपुगडे यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार टिपुगडेवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

आपल्याविरोधात तक्रार दिल्याचे समजताच सागर टिपुगडे व त्याचा मित्र अमित दावणे हे दोघेजण श्रीराम कोगनुळीकर याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. यावेळी ‘तुम्ही टिपुगडे यांना का मारले?’असा जाब अमित दावणेने श्रीराम कोगनुळीकरला विचारला. त्यावर ‘तू कोण विचारणार?’ असे म्हणून त्याच्या छातीवर हाताने दणका मारून त्याला सुमारे ६० फूट खाली ढकलून दिले. यामध्ये अमित दावणे हा वाहनतळ मजल्यात पडून गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित श्रीराम कोगनुळीकर व त्याचे कुटुंबीय पसार झाले. हा प्रकार समजताच पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील पंचनामा केला. या प्रकरणी संशयित श्रीराम कोगनुळीकर याच्यावर खुनाचा दाखल झाला असून, शोध त्याचा पोलिस घेत आहेत. याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे करीत आहेत.

अमित मर्दानी खेळाचा प्रशिक्षक.

अमित दावणेच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. आई उषा या भवानी मंडपात खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर कामास आहेत, तर बहीण उच्चशिक्षित आहे. अमित हा मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक शिकवितो, तसेच तो पडेल ते काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने मिरजकर तिकटी येथे शिवजयंतीनिमित्त मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके केली होती, तर पुण्यात शिवजयंतीनिमित्त त्याचा आज, शुक्रवारी कार्यक्रम होता.टिपुगडेच्या घरावर हल्ल्याची चर्चा

कोगनुळीकर व टिपुगडे कुटुंबीय यांच्यात वाद आहेत. बुधवारी (दि. २६) वाद झाला. त्यामुळे कोगनुळीकरने टिपुगडेच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर टिपुगडेने त्याला प्रत्युत्तर देत कोगनुळीकरला व त्याच्या मुलाला शिवीगाळ करून दमदाटी केली असल्याची चर्चा स्वाती विहार अपार्टमेंटमध्ये गुरुवारी होती.

टिपुगडे सलून व्यावसायिक, कोगनुळीकर मॅनेजर

सागर टिपुगडे याचे मंगळवार पेठ, नंगीवली चौकात सलून दुकान आहे; तर संशयित श्रीराम कोगनुळीकर हा एका पत्त्याच्या क्लबवर व्यवस्थापक असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. टिपुगडे हा गायब असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.