शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर, आठ दिवस पुरेल एवढाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

कोल्हापूर : कोरोनाबाबतचे लसीकरण सुरू झाल्याने रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होणार आहे. कोल्हापुरात ...

कोल्हापूर : कोरोनाबाबतचे लसीकरण सुरू झाल्याने रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होणार आहे. कोल्हापुरात सध्या आठ दिवस पुरेल एवढाच रक्त पिशव्यांचा साठा आहे.

जिल्ह्यात जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात लसीकरण सुरू झाले. सध्या लसीकरणाचा वेग वाढला असून, रोज सुमारे १५ हजार जणांचे लसीकरण होत आहे. लस घेतल्यानंतर संबंधिताला दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तदान करणारे कमी होत आहेत. त्याचा परिणाम रक्त उपलब्धतेवर होणार आहे. सीपीआरसह अन्य १२ रक्तपेढ्यांमध्ये सध्या १६३१ रक्तपिशव्यांचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे लस घेण्यापूर्वी नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन सर्व रक्तपेढ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट

सीपीआर रक्तपेढीत आठ दिवसांचा साठा

सीपीआर रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये १४३ रक्त पिशव्या, तर अन्य अकरा रक्तपेढ्यांमध्ये १४८८ पिशव्या शिल्लक आहेत. त्या पुढील आठ दिवस पुरतील. त्यानंतर रक्ताचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाआधी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा रक्त संकलन समन्वय अधिकारी दीपा शिपूरकर यांनी शुक्रवारी केले.

चौकट

‘जीवनधारा’मध्ये २२० पिशव्या

जीवनधारा ब्लड बँकेमध्ये दि. १ ते १५ मार्चमध्ये ६५१, तर दि. १६ मार्च ते दि. २ एप्रिल या कालावधीत ५८७ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. सध्या २२० पिशव्या शिल्लक आहेत.

चौकट

‘अर्पण’मध्ये १२५ पिशव्या

लक्ष्मीपुरी परिसरातील अर्पण ब्लड बँकेमध्ये दि. १ ते १५ मार्च या कालावधीत ५९७, तर शुक्रवारअखेर ४७२ पिशव्यांचे संकलन झाले. सध्या १२५ पिशव्या शिल्लक आहेत.

चौकट

राजर्षी ब्लड बँकेत ६३ पिशव्या

शाहुपुरीतील राजर्षी शाहू ब्लड बँकेमध्ये मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात १६८, तर दुसऱ्या पंधरवड्यामध्ये १२२ पिशव्यांचे संकलन झाले. सध्या ६३ पिशव्या शिल्लक आहेत.

चौकट

लसीकरणाआधी करा रक्तदान

कोरोनाचे लसीकरण झालेली व्यक्ती दोन महिने रक्तदानासाठी अपात्र ठरणार आहे. रक्त आणि रक्तघटकांच्या मागणीत वाढ होत आहे. लसीकरणाचे नियोजन केले जात असल्याने पूर्वनियोजित रक्तदान शिबिरे रद्द होत आहेत. त्यामुळे रक्तपेढ्यातील साठा संपत आला आहे. जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधी, औद्योगिक संस्थांना रक्तदान शिबिरांच्या आयोजनासंदर्भात विशेष आवाहन करावे, असे कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगुरकर यांनी केले.

अन्य रक्तपेढीमधील शिल्लक साठा (पिशव्यांमध्ये)

संजीवन ब्लड बँक : ३४३

केएमसी ब्लड बँक : ४३

तुलसी ब्लड बँक : १९१

वैभवलक्ष्मी ब्लड बँक : ११७

अण्णासाहेब गळदगे ब्लड बँक : १८२

लायन्स ब्लड बँक : ९१

डॉ. डी. वाय. पाटील ब्लड बँक : २८

आधार ब्लड बँक : ८५

===Photopath===

020421\02kol_3_02042021_5.jpg~020421\02kol_4_02042021_5.jpg

===Caption===

डमी फोटो (०२०४२०२१-कोल-ब्लड बँक)~ (०२०४२०२१-कोल-ब्लड बँक डमी)