बानगे (ता. कागल) येथील संयुक्त जगदंब प्रतिष्ठान यांच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे. याचे भान ठेवून येथील युवकांनी रक्तदान शिबिराचा निर्णय घेतला.
संजीवन ब्लड बँकेचे डॉ. सागर मोरे यांनी रक्तदान शिबिराबाबत मार्गदर्शन केले. शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक प्रकाश ढेंगे यांनी केले.
प्रास्ताविक सागर कवडे यांनी केले. यासाठी सचिन सुतार, सूरज बोंगार्डे, सुशांत खोत, प्रथमेश ढेंगे, निखिल बोंगार्डे, अभिजित खोत, संकेत बोंगार्डे, बाळकृष्ण भोसले, शेखर पाटील, शुभम बोंगार्डे यांनी परिश्रम घेतले.