शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’तर्फे आजपासून महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या या कठीण काळात रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी व स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या ...

कोल्हापूर : कोरोनाच्या या कठीण काळात रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी व स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, शुक्रवारपासून ‘लोकमत’च्या वतीने ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या महारक्तदान शिबिराला प्रारंभ होत आहे. शाहू ब्लड बँक येथे सकाळी १०.३० वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद‌्घाटन होईल.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गावागावांत, तालुक्यांच्या ठिकाणी १५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या अभियानाला लोकचळवळ बनविण्यासाठी चला, सक्रिय सहभाग घेऊन मोठ्या संख्येने रक्तदान करूया आणि ‘दातृत्वाचे कोल्हापूर’ या बिरुदावलीला रक्तदानाचा नवा आयाम देऊया... असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हटले जाते. एकमेकांशी परिचय नसलेल्या व्यक्तींमध्येही या रक्तदानामुळे नाते जोडले जाते. आपल्या या एका पावलाने एखाद्याचा जीव वाचू शकतो, ही भावनाच समाधान देणारी असते. ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी लोकमत समूहातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्ग सुरू झाल्याने रक्तदानावर मर्यादा आल्या. रक्तदानाचे प्रमाण घटल्याने थॅलेसीमियासारखे आजार असलेल्या रुग्णांना किंवा आपत्कालीन परिस्थितीतून जात असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासू लागली. आजही परिस्थिती बदललेली नाही, अनेक ब्लड बँकांमध्ये रक्ताची कमतरता आहे.

या कठीण काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत ‘लोकमत’च्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ब्लड बँकांमधील रक्ताच्या पिशव्यांची कमतरता भरून निघणार आहेच; पण महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.

---

अशी होतील रक्तदान शिबिरे

दिनांक : वेळ : ठिकाण

२ जुलै - १० ते ४ : राजर्षी शाहू ब्लड सेंटर, नागाळा पार्क, कोल्हापूर

३ जुलै : १० ते ४ : जीवनधारा ब्लड बँक, राजारामपुरी, कोल्हापूर

३ जुलै : ९ ते २ : एस. जे. फौंडेशन, त्र्यंबोली लॉन, लाईन बझार, कोल्हापूर

४ जुलै : ९ ते २ : कळंबा जेल, कारागृह अधिकारी-कर्मचारी निवासस्थान, कोल्हापूर

४ जुलै : ९ ते २ : मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटल, मंगळवार पेठ, कोल्हापूर

४ जुलै : १० ते २ : स्वामी स्वरूपानंद हॉल, नवीन न्यायालय, बावडा रोड

४ जुलै : १० ते ४ : नगर परिषद सांस्कृतिक हॉल, एस. टी. स्टँडजवळ, पन्हाळा

५ जुलै : १० ते ३ : ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी

५ जुलै : १० ते ३ : लायन्स क्लब हॉल, इचलकरंजी

६ जुलै : १० ते ४ : महात्मा फुले सूतगिरणी, वाठार, पेठवडगाव

७ जुलै : १० ते ४ : आबासाहेब भोगावकर हायस्कूलसमोर, बाजारभोगाव

८ जुलै : ९ ते २ : मुस्लीम बोर्डिंग हॉल, दसरा चौक, कोल्हापूर.

८ जुलै : १० ते ४ : महादेव मंदिर, सांगरूळ, ता. करवीर

९ जुलै : १० ते ४ : हनुमान दूध संस्था, गाडेगोंडवाडी (ता. करवीर)

९ जुलै : ९ ते १ : मध्यवर्ती प्रशासकीय, सांस्कृतिक हॉल, आजरा

१० जुलै : १० ते ४ : कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कळे

११ जुलै : १० ते २ : गुरुनानक हॉल, गांधीनगर

११ जुलै १० ते ४ : मोरेवाडी ग्रामपंचायत हॉल

११ जुलै : १० ते ४ : देशमुख इंग्लिश मीडिअम हायस्कूल, साने गुरुजी वसाहत

११ जुलै : १० ते ४ : हनुमान मंदिर, कोतोली, ता. पन्हाळा

११ जुलै : १० ते ३ : चौंडेश्वरी मंदिर, सरुड, ता. शाहूवाडी

११ जुलै : ९ ते २ : मर्चंट‌्स असोसिएशन सभागृह, नववी गल्ली, जयसिंगपूर

१८ जुलै : ८ ते ५ : केंद्रीय शाळा, पाचगाव, ता. करवीर

---

सूचना : कंपोझिट लोगो वापरावा.

---