करंजफेण : ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी तथा बाबूजी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या 'लोकमत नातं रक्ताचं' या उपक्रमातंर्गत कोतोली (ता. पन्हाळा) येथे आज रविवार (दि.११) रोजी होत आहे. हनुमान मंदिर सभागृहात सकाळी ९ ते ३ या वेळेत रक्तदान होणार आहे. पन्हाळा प्रेस रिपोर्टस पत्रकार संघ तसेच कोतोली व कोतोली परिसरातील तरुण मंडळांच्या पुढाकारातून व सहकार्यातून हे शिबिर पार पडणार आहे. यावेळी सरपंच पी. एम. पाटील, उपसरपंच राजेंद्र लव्हटे, ग्रा. पं. सदस्य तसेच जि. प. सदस्य शंकर पाटील, पन्हाळा पंचायत समिती उपसभापती रश्मी कांबळे, मंडलधिकारी सतीश ढेंगे, आरोग्यधिकारी डाॅ. कुणाल चव्हाण विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर होणार अाहे.
कोतोलीत आज महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST