स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन, श्रीनाथ सहकार समूह आणि शिवराज पतसंस्था यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिराचे उद्घाटन शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत ऊर्फ बाॅबी माने यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. ज्येष्ठ नगरसेवक चद्रंकात गवळी, जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, रमेश माळी, धनराज घाटगे, शिवराज्य मंचचे इंद्रजित घाटगे प्रमुख उपस्थितीत होते. ‘लोकमत’चे उपव्यवस्थापक (आय. सी. डी) महावीर विभुते, कागल तालुका प्रतिनिधी जहाँगीर शेख, बाबासाहेब चिक्कोडे, बाबासाहेब हाळीज्वाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जीवनधारा रक्तपेढीच्या वतीने संकलन करण्यात आले.
या शिबिरात पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, काॅम्रेड शिवाजी मगदूम, डॉ. अनिल भोसले, भाजप युवा कार्यकर्ते हिदायत नायकवडी, सुशांत कालेकर, दीपक मगर, असिफ मुल्ला, बैतुलमाल कमीटीचे जमीर नाईक, नगरपालिका कर्मचारी संघटनेचे सुरेश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, गणेश सोनुले, इरफान मुजावर, बाॅबी बालेखान, वनमित्र संस्थेचे नाना बरकाळे, सचिन घोरपडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट. शाहू साखर कामगारांची शिस्त..
या रक्तदान शिबिरात भाग घेण्यासाठी शाहू साखर कारखान्याचे कर्मचारी गैबी चौकात एकत्र जमून शिस्तबद्ध पद्धतीने सभागृहात आले. सर्वांचे रक्तदान झाल्यानंतर जवाहरलाल दर्डा याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून एकत्रितच बाहेर पडले.
१० कागल ब्लड डोनेशन
फोटो कॅपशन
कागल येथे ‘लोकमत’च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन यशवंत ऊर्फ बाॅबी माने यांच्या हस्ते झाले. या वेळी धनराज घाटगे, रमेश माळी, उत्तम कांबळे, नगराध्यक्षा माणिक माळी, कागल तालुका प्रतिनिधी जहाॅंगीर शेख, चद्रंकात गवळी उपस्थित होते.
2)
कागल येथील रक्तदान शिबिरास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. इंद्रजित घाटगे यांनी स्वागत केले.