शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

काँग्रेस कमिटीमध्ये २३० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:21 IST

कोल्हापूर : ‘मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा’, असे आवाहन करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ...

कोल्हापूर : ‘मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा’, असे आवाहन करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिर घेतले. त्याला प्रतिसाद देत एकूण २३० जणांनी रक्तदान केले.

येथील काँग्रेस कमिटीमध्ये सकाळी नऊ वाजता पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते, तर आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद‌्घाटन झाले. उजळाईवाडी येथील राहुल आणि निशा मिनेकर यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याची नोंदणी करून त्याने रक्तदान केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, स्वाती नलवडे, उज्ज्वला चौगले, पद्मिनी माने, शिवांगी खोत, आदींसह एकूण २३० जणांनी रक्तदान केले. यावेळी माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, विद्याधर गुरबे, तौफिक मुल्लाणी, प्रवीण केसरकर, सचिन चव्हाण, संजय पवार-वाईकर, दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, संजय मोहिते, आदी उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सीपीआर, राजर्षी शाहू ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.

चौकट

रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा

जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्तसाठा कमी आहे. रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये, यासाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्याला काँग्रेसचे कार्यकर्ते, नागरिकांनी प्रतिसाद दिला. रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी नागरिक, तरुणाईने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून रक्तदान करावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.

फोटो (०५०४२०२१-कोल-ब्लड डोनेशन कॅम्प) : कोल्हापुरात सोमवारी काँग्रेस कमिटीमधील रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. यावेळी शेजारी संजय पवार, दुर्वास कदम, प्रल्हाद चव्हाण, निलोफर आजरेकर, आदी उपस्थित होते.

===Photopath===

050421\05kol_2_05042021_5.jpg

===Caption===

फोटो (०५०४२०२१-कोल-ब्लड डोनेशन कॅम्प) : कोल्हापुरात सोमवारी कॉंग्रेस कमिटीमधील रक्तदान शिबीरातील रक्तदात्यांना पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. यावेळी शेजारी संजय पवार, दुर्वास कदम, प्रल्हाद चव्हाण, निलोफर आजरेकर, आदी उपस्थित होते.