शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: October 13, 2014 23:02 IST

पोलिसांची दक्षता : सर्व वाहनांची कसून तपासणी सुरू

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यात आज, रविवारपासून तीन दिवस कडक नाकाबंदीसह ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले. त्यानुसार लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी व करवीर पोलिसांनी नाकाबंदीसह संवेदनशील गावांमध्ये संचलन केले. विधानसभा निवडणुकीमुळे गट-तट एकमेकांच्या आमने-सामने येऊन कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून डॉ. शर्मा यांनी नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासूनच शहरातील चौका-चौकांत व नाक्यांवर पोलीस वाहनांची कसून तपासणी करीत होते. यामध्ये शिवाजी पूल, तावडे हॉटेल, कावळा नाका, कसबा बावडा, दसरा चौक, कळंबा नाका, वाशी नाका, सायबर चौक, उमा टॉकीज, गंगावेश, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, माउलीचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, आदींचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील १२९ संवेदनशील गावांमध्येही दहा ते बारा पोलिसांची फौज तैनात केली आहे. पाचगावसह गिरगाव, कळंबा, आदी ठिकाणी करवीर पोलिसांनी संचलन केले. वाहनांतील गॅसकिटसह लायसेन्स, कागदपत्रे तपासणी तसेच वाहन चालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी सुरू होती. गाड्या रेस करणे, कर्कश आवाज, नंबरप्लेट व वाहन परवाना नसलेल्यांवर कारवाई केली जात आहे. (प्रतिनिधी) ंपोलिसांची रॅलीशहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्यासह चार ठाण्यांचे निरीक्षक व पोलिसांनी शहरात आज दुचाकीवरून फेरफटका (रुटमार्च) मारला. बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, शुक्रवार पेठ, पंचगंगा घाट, शिवाजी पूल, तोरस्कर चौक, सोन्या मारुती चौक, मनेर मशीद, माळकर तिकटी, महाराणा प्रताप चौक, स्वयंभू गणेश मंदिर, कोंडाओळ, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज, आझाद चौक, अकबर मोहल्ला, आदी मार्गांवरून रॅली काढली.