शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भविष्याच्या स्वप्नासाठी अंधांचा रोजगार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:40 IST

काहींना काही अंशी, तर काहींना अजिबात दिसत नाही. अशा अंध सुशिक्षितांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब)तर्फे बुधवारी सकाळी अंधांचा रोजगारविषयक मेळावा संस्थेच्या शाहूपुरी चौथी गल्ली येथील कार्यालयात आयोजित केला होता. त्यात ६० अंध युवक-युवतींनी सहभाग घेत भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन घेतले.

ठळक मुद्देभविष्याच्या स्वप्नासाठी अंधांचा रोजगार मेळावानॅबचे उपक्रम; ६० हून अधिकजणांचा समावेश

कोल्हापूर : काहींना काही अंशी, तर काहींना अजिबात दिसत नाही. अशा अंध सुशिक्षितांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब)तर्फे बुधवारी  अंधांचा रोजगारविषयक मेळावा संस्थेच्या शाहूपुरी चौथी गल्ली येथील कार्यालयात आयोजित केला होता. त्यात ६० अंध युवक-युवतींनी सहभाग घेत भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन घेतले.या मेळाव्यात जिल्हाभरातून ६० हून अधिक दहावी ते अगदी एम. बी. ए. संगीत विशारद असे शिक्षण घेतलेले अंध बेरोजगार सहभागी झाले होते. यात संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. नोकरीच्या संधी कोणत्या विभागात आणि व्यवसायाच्या संधी कोठे उपलब्ध आहेत, याविषयी मार्गदर्शन केले.

याशिवाय आपआपल्या गावात व्यवसायासाठी कोणत्या संधी आहेत. याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गुुणवंत विद्यार्थिनींकरिता १.५० लाखांची शिष्यवृत्ती या संस्थेमार्फत १९९८ पासून दरवर्षी दिली जाते. ज्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, त्यांना संस्था शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणासाठी प्रेरणा देत आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोहन शंकर लाखे (राजेंद्रनगर), मंजिरी सुरेश मर्दाने (करवीर), इंद्रजित तात्यासाो कोळी (हातकणंगले), सायली लुगारे (साजणी) यांचा बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी विजय रेळेकर, दीपक बोगार, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालkolhapurकोल्हापूर