शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

कितीही ब्लॅकमेल करा; घाबरत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:24 IST

कोल्हापूर : महापालिकेत घोडेबाजार थांबविण्यासाठी पक्षीय राजकारण आणले; पण दुर्दैवाने स्थायी सभापती निवडीत पुन्हा घोडेबाजार केला. या मंडळींना शहराच्या विकासासाठी नव्हे तर सत्ता दाखविण्यासाठी हवी आहे. सत्ता घेतल्यानंतर शहरातील प्रलंबित ड्रेनेजसाठी चारशे-पाचशे कोटी रुपये आणतील, असे वाटत होते; पण निधी राहू दे; त्यांनी आमचे दोन नगरसेवकच पळवले. पालकमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी ...

कोल्हापूर : महापालिकेत घोडेबाजार थांबविण्यासाठी पक्षीय राजकारण आणले; पण दुर्दैवाने स्थायी सभापती निवडीत पुन्हा घोडेबाजार केला. या मंडळींना शहराच्या विकासासाठी नव्हे तर सत्ता दाखविण्यासाठी हवी आहे. सत्ता घेतल्यानंतर शहरातील प्रलंबित ड्रेनेजसाठी चारशे-पाचशे कोटी रुपये आणतील, असे वाटत होते; पण निधी राहू दे; त्यांनी आमचे दोन नगरसेवकच पळवले. पालकमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी पाचशे कोटी आणावेत, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले. महापौरांनी आरोप केल्यानंतर मला ब्लॅकमेल केले जात आहे; पण सत्य बोलण्यास सतेज पाटील घाबरत नाही. माझी नियत स्वच्छ असल्याचा पलटवारही त्यांनी केला.टिंबर मार्केट मॉडेल रस्त्याचे उद्घाटन रविवारी आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर हल्ला चढविला. पाटील म्हणाले, आम्हालाही नगरसेवक फोडायला जमते; पण कोणाला त्रास नको म्हणून करीत नाही. गेल्या सात वर्षांत १३०० कोटींचा निधी आणला. थेट पाईपलाईन, बसेस, ड्रेनेजचे काम केले, अजून शहराला ३२५ किलोमीटर ड्रेनेजची गरज आहे. त्यासाठी सत्ताधारी मंडळी ४००-५०० कोटी निधी आणतील, अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरली असून, हॉटेलच्या दारावरून जाताना जेवणाचा वास येतो, पण प्रत्यक्ष जेवण मिळत नाही, अशी भाजप सरकारची अवस्था झाली आहे.सतेज पाटील म्हणाले, आयकर, विक्रीकराच्या कारवाईच्या भीतीने कोण बोलणार नाही. आमच्या महापौर परवा बोलल्या, त्यावरून मला ब्लॅकमेल केले जात आहे; परंतु सत्य आहे ते बोलण्यास सतेज पाटील घाबरत नाही. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. माझी नीतिमत्ता स्वच्छ आहे. मी जो करतो ते शहराच्या विकासासाठी आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा आम्ही भरपूर बघितली आहे. ती आम्हाला महत्त्वाची नाही. ३०-४० वर्षे या पदांमध्येच आहोत, श्रीमंती आमच्या घरची आहे. या गोष्टींचे आकर्षण आम्हाला नाही. माझे शहर चांगले झाले पाहिजे, एवढेच आकर्षण आहे. चुकत असेल तर कान धरा; पण चांगल्याला चांगले म्हणायला शिका, असा टोलाही त्यांनी लगावला. महापौर स्वाती यवलुजे, सागर चव्हाण, वनिता देठे, सुरेखा शहा, दिलीप पोवार, शारंगधर देशमुख, संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, तौफिक मुल्लाणी, हरिभाई पटेल, लक्ष्मीभाई पटेल, आदी उपस्थित होते.सचिन चव्हाण यांनी स्वागत केले. वसंतराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी आभार मानले.... तर आमदारकीचा राजीनामा...!आम्हीही मंत्री होतो; पण प्रसारमाध्यमांना धमकी कधी दिली नाही. तसे दाखवा, आमदारकीचा राजीनामा देतो. लोकप्रतिनिधींना योग्य रस्त्यावर आणण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. देशात दबावाचे राजकारण सुरू आहे; तेच कोल्हापुरात सुरू आहे; पण ही शाहूंची भूमी आहे. जनतेवर जेवढा दबाव टाकाल तेवढा उफाळून येतो, हा इतिहास आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना जनता सोडत नाही, माझ्या चुकाही दाखविण्याचे काम केल्याचे पाटील यांनी सांगितले.आयुक्त दबावाला घाबरतातसचिन चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करीत, टिंबर मार्केटमधील अंतिम लेआउटचे काम पूर्ण करा. आयुक्त तुमचे ऐकतील. गेले तीन-चार दिवस आयुक्त दबावाखालीच काम करीत असल्याचे पाहतोय; त्यामुळे ते तुमचे काम करतील, असे पाटील यांनी सांगितले.थेट पाईपलाईनचा अतिरिक्त भारथेट पाईपलाईनसाठी १० टक्के निधी महापालिकेने भरायचा होता, आता केंद्राने भूमिका बदलल्याने महापालिकेला ९० कोटी द्यावे लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.