राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
गगनबावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी आंदोलकांना अटक करून ताब्यात घेऊन साळवण पोलीस चौकी येथे नेण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनामध्ये गगनबावडा तालुका भाजपा अध्यक्ष संदीप पाटील, तालुका सरचिटणीस अनिल पडवळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शाहूराज काटे, डॉ. गुरुप्रसाद जाधव, माजी अध्यक्ष अर्जुन पाटील, नारायण गोंधळी, सूरज पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.