शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

पक्षवाढीसाठी भाजपकडून जोर

By admin | Updated: April 29, 2016 00:51 IST

हातकणंगले तालुका : शिवसेनेला केले सावध, काँग्रेसला पाडले खिंडार

आयुब मुल्ला--खोची --भारतीय जनता पक्षाचा हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशानिमित्त पेठवडगाव येथे मेळावा झाला. हा कार्यक्रम स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तो शिवसेनेला सावध करणारा, तर काँग्रेसला धक्का देणारा होता. म्हणजे कार्यक्रमाचे निमित्त पक्षप्रवेशाचे, तर हेतू पक्षवाढीचा असल्याचे स्पष्ट झाले.कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती म्हणजे याला पक्षीय राजकारणाचे अनेक संदर्भ होते. यावेळी डॉ. अशोक चौगुले यांच्यासह तालुक्यातील सुमारे सव्वाशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या कार्यक्रमाचे परिणाम वडगावपुरते मर्यादित नसणार आहेत, तर ते तालुकाभर परिणाम करणारे आहेत. या कार्यक्रमात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींचा सातत्याने उल्लेख झाला. स्थानिक कार्यकर्त्यांनी टीकेऐवजी विकासाची भूमिका मांडली, तर नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाहीही यावेळी नेत्यांनी दिली.वडगावात राजकीय सभा झाली की, त्याचे रंग ग्रामीण भागात उमटतात ही वस्तुस्थिती आहे. परंतु, वडगावात यादव आघाडीच्या नेत्या नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्या रचनात्मक विकासाची घोडदौड पाहता निवडणुकीत किती फरक पडेल, हा येणारा काळच सांगेल, असे बोलले जाते. नगरपालिकेत अनेक वर्षांपासून यादव घराण्याची सत्ता आहे. त्याला शह देण्यासाठी भाजपचे पाठबळ चौगुले यांच्या पाठीशी उभे राहिले आहे, हे खरे आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांची गतीही पाहण्यात जनतेला रस आहे. हा झाला शहरापुरता मर्यादित भाग.परंतु, इथल्या विधानसभा मतदारसंघावरही भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनाही या निमित्ताने सावधानतेचा इशारा भाजपने दिला आहे. सेना-भाजप युतीमुळेच मिणचेकर यांना आमदारकी मिळणे सोपे झाले होते. आता मात्र ऐक्य न झाले तर मतविभागणीचा सामना करावा लागणार आहे. भाजप येथील कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी ताकद देणार, हे निश्चित आहे. याचा उपयोग पक्षवाढीसाठी होणार आहे. काँग्रेसला तर हा कार्यक्रम धक्का देणारा आहे. सत्ता असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळच दिले नाही. कार्यकर्ता मोठा झाला, त्याला प्रतिष्ठेचे पद दिले, तर नेता मोठा होतो, पक्ष वाढतो, हा विसरच नेत्यांना पडला. आता तर हे सत्तेतच नाहीत, त्यामुळे या पक्षातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. पक्षात गट-तट आहेत, अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती) लढविताना कसरत होणार आहे, हे लक्षात आल्याने काहीजण शांत बसूया, असेही बोलत आहेत. मतविभागणी होण्याची शक्यतासेना व भाजपने विधानसभेला स्वतंत्र उमेदवार दिले तर मात्र पूर्वीपासून असणाऱ्या युतीच्या मतांची विभागणी होईल. त्याचा फायदा काँग्रेसला होईल, याचा आनंद काँग्रेसला आहे. तीच स्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेत राहिली तरीही काँग्रेसला पोषक वातावरण राहील, असा अंदाज काँग्रेसवाले व्यक्त करीत आहेत. या कार्यक्रमाने पक्षीय राजकारणाची बीजे रोवली आहेत. तसेच सेना आमदारांना सावध करीत काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट भाजपचे कार्यकर्ते मात्र उत्साही झाले आहेत.