कोल्हापूर : भाजप कोल्हापूर महानगरच्यावतीने राधाबाई मंगल कार्यालय, शिवाजी पेठ व इंद्रप्रस्थ हॉल, राजारामपुरी येथे दोन दिवसाचे जिल्हास्तरीय पंडित दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग पार पडले.
या प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख म्हणून भाजप चिटणीस प्रदीप उलपे यांनी गेले १५ दिवस नियोजन केले. संतोष माळी, डॉ. सदानंद राजवर्धन यांनी स्वागत केले. सरचिटणीस हेमंत आराध्ये, माजी शिक्षण सहाय्यक उपसंचालक संपत गायकवाड, अजित ठाणेकर, कमलाकर बुरांडे, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, शेखर धर्माधिकारी, विवेक मंद्रूपकर, मुकुंद भावे, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गात संघटन सरचिटणीस अशोक देसाई व बावडा शक्ती केंद्रप्रमुख मनोज इंगळे यांनी सांघिक गीत सादर केले. सूत्रसंचालन संघटन सरचिटणीस अशोक देसाई व अक्षय निरोखेकर यांनी केले तर महादेव बिरजे यांनी मानले. २४६ अभ्यागतांनी सहभाग घेतला.