शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 13:42 IST

संजय मंडलिक यापुढच्या काळात काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतच, अशी गुगलीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाकली.

कोल्हापूर : काही नेत्यांची फसवण्याची परंपरा आहे. पक्ष, संघटनेलाही काही जण फसवत आले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीत नेत्यांनी फसवणूक केली हे उघड आहे. परंतु काळ बदलला आहे. या जन्मातच सगळे फेडायचे आहे. असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ आघाडीसोबत जाऊनही प्रकाश आवाडे यांचा पराभव झाला. आजऱ्यामध्ये भाजपचेच अशोक चराटी हरले. भाजपच्या आणि जवळीक असणाऱ्यांना जाणीवपूर्वक पाडले आहे का? अशी विचारणा केली पाटील यांनी आघाडीतील नेत्यांना हा इशारा दिला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे भाजपच्या विचारांशी जवळीक असलेले होते. परंतु कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेला मिळाल्याने ते कॉंग्रेसमध्ये गेले. त्यांच्या पत्नी जयश्रीताई आणि बंधू संभाजी हे भाजपचेच नगरसेवक होते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत जयश्रीताई यांची वेळ घेऊन त्यांना भेटून भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची विनंती करणार आहे, अशी माहिती ही पाटील यांनी या‌वेळी दिली.यावेळी पाटील म्हणाले, आम्ही विनंती केल्यानंतरही जर त्यांनी भाजपच्यावतीने निवडणूक लढण्यास नकार दिला तर, मग आमची जी राज्यस्तरीय १३ जणांची कोअर कमिटी आहे ही याबाबतचा निर्णय घेईल.मंडलिक काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतजिल्हा बॅंकेत विनय कोरे, अमल महाडिक, विजय माने असे तिघे जण आहेत. त्यामुळे संजय मंडलिक यापुढच्या काळात काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतच, अशी गुगलीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाकली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटील