शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातही भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात-- चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:14 IST

मुरगूड (जि. कोल्हापूर) : सध्या राज्यात रयत क्रांती संघटना, शिवसेना अशा अनेक पक्षांना एकत्र घेऊन आम्ही सरकार चालवित आहोत. जिथे विकास आहे,

ठळक मुद्दे: बिद्री कारखान्यात भाजप-राष्ट्रवादीची युती

लोकमत न्यूज नेटवर्कमुरगूड (जि. कोल्हापूर) : सध्या राज्यात रयत क्रांती संघटना, शिवसेना अशा अनेक पक्षांना एकत्र घेऊन आम्ही सरकार चालवित आहोत. जिथे विकास आहे, तिथे मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे लागते. या मुद्द्यावरच बिद्री साखर कारखान्यामध्ये भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. उद्या राज्यातसुद्धा राष्ट्रवादी व भाजप एकत्र आले तर आश्चर्य वाटू नये, असे प्रतिपादन करीत आम्हाला कोणाचे वावडे नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

बिद्री (जि. कोल्हापूर) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार शुभारंभासाठी वाघापूर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले चंद्रकांतदादा पाटील व माजी मंत्री हसन मुश्रीफ एका व्यासपीठावर येणार म्हणून सर्वांच्या नजरा या मेळाव्याकडे लागल्या होत्या. सभेत पाटील यांनी राष्ट्रवादीबरोबर आपली युती होऊ शकते, असा इशाराच जणू शिवसेनेला दिल्याने राज्यात तर्क-वितर्काला सुरुवात होणार आहे.मुंबईतील सर्व कामे फोनवरच...चंद्रकांत पाटील म्हणाले, या सभेला येताना इतकी गर्दी पाहून आज बिद्रीच्या निकालाची तारीख आहे की काय, असे मला वाटले. गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या नजरा आजच्या सभेकडे होत्या. कारण मी आणि हसन मुश्रीफ एका व्यासपीठावर येणार होतो; पण आज सकाळी मुंबईमध्ये दुर्दैवाने मोठी दुर्घटना घडली आणि मुख्यमंत्री परदेश दौºयावर असल्यामुळे नंबर दोनची जबाबदारी माझ्याकडे असल्याने मला मुंबईला जावे लागेल की काय असे वाटत होते. पण मी जर मुंबईला गेलो, तर या सभेकडे नजरा लावून बसलेल्या अनेकांच्या उत्सुकतेवर पाणी पडले असते. मी मुंबईतील सर्व कामे फोनवर आटोपून या सभेला आलो आहे.