शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

आश्वासनांची वचनपूर्ती... चंद्रकांत पाटलांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 19:54 IST

Chandrakant Patil : शहीद संग्राम पाटील आणि शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे.

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनी दोन्ही कुटुंबीयांना मदत करत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.

मुंबई : देशाच्या संरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या प्राणांची आहुती देणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद संग्राम पाटील आणि शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी शहीद संग्राम पाटील यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तर शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांसाठी  स्वतःच्या हक्काच्या घरासाठी मदत केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे सुपुत्र संग्राम पाटील आणि आजरा तालुक्यातल्या बहिरे गावचे सुपुत्र हृषिकेश जोंधळे यांना सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले. संग्राम पाटील यांना दोन मुले असून, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. संग्राम पाटील यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. 

तर हृषिकेश जोंधळे यांचे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहतात. त्यामुळे हृषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना पक्क घर बांधून देण्याचा शब्द चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी दोन्ही कुटुंबीयांना मदत करत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.

काल प्रजासत्ताक दिनी संग्राम पाटील यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अडीच-अडीच लाखांच्या निधी संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आला. तर हृषिकेश जोंधळे कुटुंबाला घरासाठी निधी उपलब्ध करून दिला. हा निधी माजी आमदार अमल महाडिक यांच्यामार्फत दोन्ही कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर