शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने सहकार मोडीत काढला : प्रकाश आबिटकर- मंडलिक प्रतिष्ठानचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:35 IST

कसबा सांगाव : भाजपाचा प्रत्येक बाबतीत अतिरेक सुरू आहे. विकासाची कामे प्रत्यक्षात होत नसून तीन वर्षांत सहकारात नवीन सूतगिरण्या, साखर कारखाने झाले नाहीत.

कसबा सांगाव : भाजपाचा प्रत्येक बाबतीत अतिरेक सुरू आहे. विकासाची कामे प्रत्यक्षात होत नसून तीन वर्षांत सहकारात नवीन सूतगिरण्या, साखर कारखाने झाले नाहीत. फक्त आहे ते मोडायचे काम चालले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेपासून जिल्हा बँकेपर्यंत फक्त आडवाआडवी सुरू आहे. अशा कारभारामुळे पुढच्या पिढ्यांचे नुकसान करण्याचे काम सुरू आहे, असा घणाघात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला.

कागल येथे मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त युवा चैतन्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वीरेंद्र मंडलिक, सौरभ शेट्टी, जितेंद्र कदम, हर्षल सुर्वे हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आबिटकर म्हणाले की, एका बाजूला लोकांच्या विश्वासाचे राजकारण सुरू आहे, तर दुसºया बाजूला पैसे, पदे खिरापती वाटण्याचे सुरू आहे. सत्तेच्या जोरावर लोकांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वर्गीय खासदार मंडलिक व खासदार राजू शेट्टी यांनी लोकांच्या विश्वासावरच निवडणुका जिंकल्या. आज माणसांचे मन सांभाळणे हे राजकारण्यांचे महत्त्वाचे काम आहे,

वीरेंद्र मंडलिक म्हणाले, या प्रतिष्ठानचा विस्तार वाढला असून शाहूंच्या विचाराचे खरे वारसदार आम्हीच आहोत. खासदार मंडलिकसाहेबांना जशी साथ दिली, तशी मला साथ द्या.कार्यक्रमासाठी दिग्विजय कुºहाडे, राजेखान जमादार, संताजी घोरपडे (खडकेवाडा), धनराज घाटगे, बाबा नांदेकर, रमेश पाटील, अभिजित तायशेटे, विद्याधर गुरबे, विवेक कुलकर्णी, बाबगोंड पाटील, कैलास जाधव, आदी उपस्थित होते.पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांचे प्रश्न बिकट झाले असून, कोणालाही कायम केले जात नाही. त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने मंडलिक प्रतिष्ठानने काम करावे. कामगार आयुक्त आणि कारखानदारांचे साटेलोटे आहे. कामगारांच्या भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी काम करा. प्रत्येकजण स्वत:च्या आयुष्याचा आमदार आहे. त्याचा इगो दुखवू नका, नाहीतर तुमची आमदारकी गेली उडत, असा टोला आबिटकर यांनी लगावला.कागल येथे मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त काढलेल्या रॅलीत वीरेंद्र मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर सहभागी झाले होते.