शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

भाजपमध्ये या... अन्यथा कुठेच जाऊ नका

By admin | Updated: April 20, 2016 01:17 IST

अशोकअण्णांना हाळवणकरांचा सल्ला : आजरा सूतगिरणीच्या गारमेंट प्रकल्पाचे उद्घाटन

आजरा : आजरा सूतगिरणी ही स्व. काशिनाथअण्णा चराटी व स्व. माधवराव देशपांडे यांच्या दूरदृष्टीने भक्कम आर्थिक पायावर उभी असून, १00 वर्षे चांगल्या पद्धतीने चाललेल्या या संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी भाजपमध्ये यावे. आम्ही सर्व ताकद पुरवू, अन्यथा कोठेच जाऊ नये, असा सल्ला आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिला.आजरा सूतगिरणीच्या गारमेंट प्रकल्पाचा प्रारंभ व सूतगिरणीच्या नूतन मशिनरींच्या उद्घाटनप्रसंगी आमदार हाळवणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीपतराव देसाई होते.यावेळी हाळवणकर म्हणाले, वस्त्र ही प्रमुख मूलभूत गरज असल्याने वस्त्रोद्योग चालले पाहिजेत; परंतु महाराष्ट्रातील अनेक सूतगिरण्यांवर संचालकांनीच दरोडा घातल्याने अनेक सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. अशावेळी आजरा सूतगिरणीची वाटचाल कौतुकास्पद आहे. सूत उद्योगास केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ उठवावा. ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’सारखे उपक्रम राबवावेत. सूतगिरणीच्या माध्यमातून तालुक्यातील बचत गटांच्या महिलांनाही चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असेही सांगितले.आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, जागेपणी स्वप्ने पाहून ती पूर्तीस नेणाऱ्या स्व. काशिनाथअण्णा व स्व. माधवराव देशपांडे यांनी अत्यंत खडतर अशा परिस्थितीत सूतगिरणीची उभारणीच केली नाही, तर ती उत्कृष्ट पद्धतीने चालवून सूतगिरणी चळवळीला दिशा देण्याचे काम केले आहे.अशोकअण्णा चराटी म्हणाले, महाराष्ट्रातील उत्कृष्ट दहा सूतगिरण्यांमध्ये आजरा सूतगिरणीचा समावेश आहे; परंतु सूतगिरण्या अनंत अडचणीतून वाटचाल करीत आहेत. शासनाने वीज दर कमी करून सूतगिरण्यांना दिलासा देण्याची गरज आहे. गारमेंटच्या माध्यमातून ४०० महिलांना रोजगार देण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही स्पष्ट केले.अमोल वाघ यांनी स्वागत, रजनिकांत नाईक यांनी आभार, तर सचिन सटाळे यांनी सूत्रसंचालन केले. उद्योजक बापूसाहेब सरदेसाई, सी. डी. काणे, अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, बाबूराव कुंभार, अरुण देसाई, बापू टोपले, मलिककुमार बुरूड, राजू जाधव, प्रकाश कोंडुसकर, दिगंबर देसाई, दशरथ अमृते, संभाजी पाटील, संजयभाऊ सावंत, एन. डी. केसरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मार्गदर्शन करा... कारखाना ताब्यात घेतो..!आजरा साखर कारखाना निवडणुकीत आपण मार्गदर्शन केल्यास कारखाना ताब्यात घेतल्याशिवाय राहत नाही, असे अशोकअण्णांनी जाहीररीत्या आमदार हाळवणकरांना सांगितले.आजरा सूतगिरणीच्या गारमेंट प्रकल्पाचे उद्घाटन करताना आमदार सुरेश हाळवणकर. शेजारी आमदार प्रकाश आबिटकर, अशोकअण्णा चराटी, आदी उपस्थित होते.