जन्मकाळानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दत्त मंदिरात पहाटेच्या काकडआरती व पूजेनंतर सूर्योदयावेळी सकाळी ६.२० वाजता जन्मकाळ सोहळा झाला. येथील दिलीपशास्त्री उपाध्ये यांनी पुराण वाचन केले. गोविंद दत्तात्रय पुजारी यांनी विधिवत पूजन केले. येथील ब्रम्हवृंदांनी पारंपरिक पाळणा म्हटला व महिलांनी श्रींचा पाळणा जोजविला व मंगल आरतीने ओवाळले. यानंतर भक्तांना सुंठवडा व शिरा प्रसादाचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे यंदाही भाविकांविनाच जन्मकाळ सोहळा झाला. जेरे पुजारी व परिवार यांनी देवस्थानच्या सहकार्याने जन्मकाळ व महाप्रसादाचे नियोजन केले होते.
फोटो ओळी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात शुक्रवारी सकाळी सूर्योदयावेळी श्रीपाद श्रीवल्लभ महाराज जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.