शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरमध्ये जैव वैद्यकीय कचºयांचे ढीग दुर्गंधीने रुग्ण त्रस्त : कचरा उठाव करणाºया संस्थेचे बिल गेले दहा महिने थकल्याने सर्वत्र पिशव्यांच्या थप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:50 IST

कोल्हापूर : येथील सीपीआर जिल्हा रुग्णालयातील कचºयाचा उठाव करणाऱ्या खासगी संस्थेचे बिल गेले दहा महिने प्रलंबित असल्याने त्या कंपनीने कचरा उठावाचे कामच गेल्या आठ दिवसांपासून बंद

कोल्हापूर : येथील सीपीआर जिल्हा रुग्णालयातील कचऱ्याचा उठाव करणाऱ्या खासगी संस्थेचे बिल गेले दहा महिने प्रलंबित असल्याने त्या कंपनीने कचरा उठावाचे कामच गेल्या आठ दिवसांपासून बंद केले आहे. परिणामी, सीपीआरच्या कोणत्याही विभागात जायचे म्हटले तर दारात कचºयाचे ढीगच तुमचे स्वागत करीत आहेत. त्याची दुर्गंधी रुग्ण व नातेवाइकांनाही असह्य करीत आहे; परंतु याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. संबंधित ठेकेदार कंपनीकडून काही तरी टक्केवारी मिळावी यासाठी त्याचे बिल काढले जात नसल्याची चर्चा सीपीआर परिसरात सुरू आहे.

सीपीआरमध्ये जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांतील रुग्णही उपचारासाठी दाखल होत असतात. अलीकडे तिथे अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. निधीही चांगला उपलब्ध होत आहे. त्यामुळे सोयी-सुविधा वाढू लागल्या आहेत. रुग्णांनाही त्याचा चांगला उपयोग होत आहे. एका बाजूला हे चांगले चित्र असताना काही चुकीच्या गोष्टीही घडत आहेत. त्याकडे काही सजग नागरिकांनी ‘लोकमत’चे लक्ष वेधले.

ज्या खासगी कंपनीकडे कचरा उठावाचे काम दिले आहे, ते हा कचरा उचलून त्याची झूम प्रकल्पाजवळ उपलब्ध करून दिलेल्या स्वतंत्र जागेत त्याची विल्हेवाट लावतात; परंतु या कामाची त्यांची नियमित बिले काढली जात नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे बिल थकले की कचरा उठाव बंद अशी स्थिती आहे. मग कोणीतरी राजकीय दबाव आणून कंपनीला दटावणी केली की पुन्हा काही दिवस कचरा उठाव केला जातो, असे वास्तव आहे; परंतु आता दहा महिन्यांचे बिल थकीत असल्याचे व त्यामुळे कचरा उठाव थांबविल्याचे सांगण्यात आले. 

आंधळा कारभार..कचरा उठावाचे काम करणाºया संस्थेचे बिल दहा महिने थकीत आहे व ठेकेदार कंपनी कचरा उठावच करायला तयार नसेल तर ही बाब अभ्यागत समितीच्या निदर्शनास कशी आली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मग समिती फक्त बैठका घेऊन ‘चमकण्यासाठीच’ आहे की काय, अशीही विचारणा होऊ लागली आहे.कुठे आहे अभ्यागत मंडळ...सीपीआरच्या कारभारात सुधारणा म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने अभ्यागत मंडळ नेमले आहे. त्यांची नियमित बैठकही होते; परंतु त्यांना सीपीआरचे मूळ प्रश्न व गैरसोयी दिसत नाहीत का? अशी विचारणा रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी बुधवारी ‘लोकमत’ने तेथे भेट दिल्यावर केली.गलथानपणाचा कळस...!जैव वैद्यकीय कचºयाचे ढीग रुग्णालयाच्या आवारात साचल्याने प्रशासनाने बुधवारी दुपारी काही कचरा गाद्यांवर टाकून चक्क पेटवूनच दिला. म्हणजे अगोदरच दुर्गंधी पसरली होती, त्यानंतर धुराने परिसर काळवंडून गेला. त्यातून जास्तच प्रदूषण झाले. हा सगळा कचरा ओला असतो. त्यामुळे पेटवून त्याची विल्हेवाट लागत नाही; परंतु तेवढेही भान प्रशासनाने बाळगले नाही. 

कचरा उठावाचा ठेका ‘नेचर अ‍ॅँड नीड’ या खासगी कंपनीकडे आहे. त्यांचे दरमहा सरासरी एक लाख रुपये बिल होते; परंतु गेल्या दहा महिन्यांपासून हे बिल थकीत आहे. त्यामुळे त्यांनी कचरा उठावाचे काम गेल्या चार दिवसांपासून बंद केले आहे; परंतु सीपीआर प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार बुधवारी ही रक्कम कंपनीला अदा केली आहे. त्यामुळे आज, गुरुवारपासून कचरा उठाव पूर्ववत होईल.- डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर