शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बिंंदू चौकात या, कोणी घर भरले ते सांगतो: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:52 IST

कोल्हापूर : मी साखरसम्राटांकडून किती पैसे घेतले आणि तुम्ही महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाममधून किती पैसे कमावले याचा हिशेब मांडण्यासाठी ...

कोल्हापूर : मी साखरसम्राटांकडून किती पैसे घेतले आणि तुम्ही महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाममधून किती पैसे कमावले याचा हिशेब मांडण्यासाठी बिंदू चौकात या, असे खुले आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. कुणी कुणाशी कशी सेंटलमेंट केली आणि कोणी कोणी घरे भरली यांचा पंचनामाच करू, असाही इशारा दिला.शुक्रवारी शिवसेना-भाजपचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीला मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेट्टींनी स्वत:चे घर भरल्याचा आरोप केला होता. या टीकेला शेट्टी यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत चर्चेसाठी समोरासमोर येण्याचे आव्हान पाटील यांना दिले आहे.भाजप आघाडीसोबत होतो तेव्हा चंद्रकांत पाटील यांना मी विष्णूचा अवतार वाटायचो. आता बाजूला झालो तर लगेच घरे भरणारा कसा काय वाटू लागलो, याचे जरा आश्चर्यच वाटत असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, राज्याचे दोन नंबरचे खाते चंद्रकांतदादा सांभाळतात. दुसऱ्या अर्थाने ते दोन नंबरचे अवैध खातेही सांभाळतात.भाजपमध्ये आजच्या घडीला १०० ते १२५ साखरसम्राटांचा भरणा आहे. ते त्यांचे आज्ञाधारक आहेत. मला पैसे दिले असे सांगणाऱ्या साखरसम्राटांना बिंदू चौकात येण्याचे आदेश द्यावेत. तेथे येऊनच त्यांनी कुणी किती पैसे दिले, कशी सेटलमेंट केली ते पुराव्यासकट सांगावे.याचवेळी मीदेखील कार्यकारी अभियंते, ठेकेदार, कृषी अधिकारी, महसुलातील अधिकारी, कलेक्टर, तहसीलदार या सर्वांना बिंदू चौकातच बोलावून घेतो. तेथेच त्यांनी किती पैसे दिले याचा पाढाच वाचून दाखवतो. डांबरात, मातीत आणि खडीमध्ये किती खाल्ले याचा पंचनामाही करू; मग कुणी घर भरले याचा सर्वांसमक्षच सोक्षमोक्ष लागेल, असे आव्हानही दिले.उसने मागणाऱ्यांकडे पैसा आला कोठून?पाटील यांना मंत्री होण्याआधी पैसे उसने मागायला लागायचे. पैसे उसने मागणाºयांकडे आता ‘किती पैसे देऊ बोला,’ असे म्हणण्याइतपत पैसा आला कोठून याचाही हिशेब त्यांनी द्यावा, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.