शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बिद्री साखर कारखान्यासाठी दुपारीपर्यंत १६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 13:50 IST

क़ोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्यासाठी आज (रविवार) सकाळ पासून संथ गतीने मतदान सुरू आहे. दुपारी साडेबारा पर्यंत केवळ १६ टक्के मतदान झाले आहे.

मुरगुड, 8 : क़ोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्यासाठी मतदान आज (रविवार) सकाळ पासून संथ गतीने सुरू आहे. दुपारी साडेबारा पर्यंत केवळ १६ टक्के मतदान झाले आहे.

बिद्री कार्यक्षेत्रातील कागल, राधानगरी, भुदरगड आणि करवीर या तालुक्यातील २२३ गावात १८७ मतदान केंद्रे आहेत. यातील सरवडे (ता.राधानगरी) या मतदान केंद्रावर गैरसमजातून दोन गटात वादावादी झाली. मुरगुड या संवेदनशील केंद्रावर अत्यंत शांततेत मतदान सुरु आहे.

पालकमंत्री आणि महसूलमंत्री आ. चंद्रकांतदादा पाटील, आ. हसन मुश्रीफ, माजी चेअरमन के. पी. पाटील यांच्याविरुद्ध आ. प्रकाश आबिटकर, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे.

 या निवडणुकीच्या निकालातून आगामी विधानसभा आणि लोकसभेचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या सर्वच नेत्यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सुमारे ५५ हजार सभासद आज मतदानाचा हक्क बजाविणार असून त्यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

मागील आठ दिवसांपासून दिग्गज नेत्यांनी जाहीर सभा घेत कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यात प्रचाराचे रान उठवले होते. आज या सर्वच नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.