शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

‘आयआरबी’चे २५ कोटी जप्त करणार : बिदरी

By admin | Updated: November 16, 2014 00:53 IST

‘स्थायी’ ची बैठक : जिल्हाधिकाऱ्यांना उद्या पत्र देऊ

कोल्हापूर : शहरात राबविण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पातील अपूर्ण कामांसह जावळाचा गणपती ते इराणी खण हा मुख्य रस्ता जर ‘आयआरबी’ने केला नाही, तर त्यांची २५ कोटी रुपयांची अनामत रक्कम जप्त करून, त्यातून ही अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबत सोमवारीच (दि. १७) जिल्हाधिकारी राजाराम माने यांना पत्र पाठवून आयआरबीचे २५ कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करावेत, अशी विनंती केली जाणार आहे. आज, शनिवारी दुपारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनीच ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी सभापती सचिन चव्हाण होते. टोलवसुली सुरू झाल्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करावीत; तसेच रस्त्यांची दुरुस्ती करावी म्हणून १ आॅक्टोबर रोजी महानगरपालिकेने आयआरबीला कळविले होते; परंतु १७ आॅक्टोबरला उलट टपाली टोलची वसुली व्यवस्थित होत नसल्याचे पत्र आयआरबीने पालिकेला दिले आहे. यामुळे अपूर्ण कामे करण्यास आयआरबी असमर्थ असल्याचे दिसते. म्हणूनच आपल्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सब-स्टेअरिंग्ां कमिटीच्या बैठकीत चर्चा करून शासनाला अहवाल दिला जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशावरून अपूर्ण कामांसाठी अनामत म्हणून ठेवलेले २५ कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करावेत, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली जाणार असल्याचे बिदरी यांनी स्पष्ट केले. शारंगधर देशमुख यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या काही दिवसांपासून शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी शारंगधर देशमुख, दिगंबर फराकटे, राजेश लाटकर, आदिल फरास, आदींनी केल्या. पुईखडी येथील कनेक्शन क्रॉस करणे आवश्यक असल्याने चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तावडे हॉटेल परिसरातील पाडण्यात आलेली बांधकामे पुन्हा नव्याने बांधण्यात आली. न्यायालयाची स्थगिती असताना अशी बांधकामे झालीच कशी? अशी विचारणा करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शारंगधर देशमुख व सभापती सचिन चव्हाण यांनी केली. त्यावेळी न्यायालयाचा अवमान झाल्याबद्दल याचिका दाखल केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी चर्चेत सुभाष रामुगडे, यशोदा मोहिते, सतीश लोळगे, सतीश घोरपडे, आदींनीही भाग घेतला. युवराज पाटील यांचा पुतळा उभारा कुस्तीसम्राट युवराज पाटील यांचा पुतळा खासबाग कुस्ती मैदानात उभारण्यात यावा, अशी मागणी राजेश लाटकर यांनी केली.